लग्नागाठ बांधण्यासाठी भारतातील ही 6 मंदिरे आहेत सर्वोत्तम, विशेष प्रसंग ठरेल अविस्मरणीय
काही महिन्यांत लग्नाचा हंगाम सुरू होणार आहे. पितृ पक्षाच्या समाप्तीनंतर शुभ कार्ये सुरू होतील. लग्नाचे मूहूर्त काढले जातील. लग्न हा प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यातील एक खास दिवस असतो आणि लोक तो दिवस अविस्मरणीय व्हावा यासाठी प्रचंड प्रयत्न करतात. लग्नाच्या निमित्ताने लोक त्यांच्या आउटफिटपासून ते दागिने आणि मेकअपपर्यंत प्रत्येक गोष्टीची विशेष काळजी घेतात. मात्र, गेल्या काही काळापासून विवाहस्थळाबाबत देखील लोकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. डेस्टिनेशन वेडिंग हि कॉन्सेप्ट सध्या लोकप्रिय होताना पाहायला मिळाली.
हेदेखील वाचा- ही 5 ठिकाणं आहेत ऐतिहासिक अवशेषांच्या सौंदर्याची उदाहरणं, वास्तुकला आणि कोरीव काम पाहून आश्चर्यचकित व्हाल
आयुष्यातील लग्नाचा खास प्रसंग आणखी खास बनवण्यासाठी लोकांनी खास ठिकाणे निवडण्यास सुरुवात केली आहे. पूर्वी लोक डेस्टिनेशन वेडिंगसाठी जयपूर, जोधपूर किंवा गोवा सारख्या ठिकाणांना प्राधान्य देत होते, आता लोक त्यांच्या आयुष्यातील या खास क्षणासाठी धार्मिक स्थळे निवडत आहेत. अशाच काही धार्मिक स्थळांविषयी आता आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, ज्या ठिकाणी तुम्ही तुमच्या जीवनसाथी सोबत लग्नगाठ बांधू शकता. (फोटो सौजन्य – pinterest)
काशी विश्वनाथ मंदिर हे भारतातील 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे, ज्याला खूप महत्त्व आहे. हे देशातील सर्वात पवित्र मंदिरांपैकी एक आहे. या मंदिराच्या पवित्र आणि ऐतिहासिक वातावरणात तुम्ही तुमच्या आयुष्याची नवी सुरुवात करू शकता. हे ठिकाण लग्नासाठी अगदी योग्य आहे.
श्रीगणेशाचे हे मुंबईतील सिद्धिविनायक मंदिर लग्नाच्या गाठी बांधण्यासाठी अगदी योग्य आहे. मुंबईत असलेल्या या मंदिराला हिंदू धर्मात खूप महत्त्व आहे. तुम्हालाही कमी लोकांसोबत पारंपारिक लग्न करायचे असेल तर हा एक लोकप्रिय पर्याय आहे.
हेदेखील वाचा- मुलांना रस्त्याच्या कडेला सोडून पालक जातात डेटवर! ‘या’ देशातील विचित्र परंपरा ऐकूण आश्चर्य वाटेल
खजुराहो येथील मातंगेश्वर मंदिर शिल्पांसाठी प्रसिद्ध आहे. हे मंदिर तुमच्या लग्नाचा खास दिवस आणखी खास बनवण्यात मदत करू शकते. तुमचे लग्न अविस्मरणीय बनवण्यासाठी तुम्ही ही जागा निवडू शकता.
भारतातील सर्वात सुंदर मंदिरांपैकी एक, मीनाक्षी अम्मन मंदिर रंगीबेरंगी शिल्पांनी सजवलेल्या सुंदर गोपुरम (टॉवर) साठी प्रसिद्ध आहे. तामिळनाडूच्या मदुराईमध्ये असलेल्या या मंदिरात तुम्ही तुमच्या लग्नाला पारंपारिक लूक देऊ शकाल, जो तुम्हाला आयुष्यभर लक्षात राहील.
पंजाबमधील अमृतसर येथे असलेले सुवर्ण मंदिर देखील लग्नासाठी एक उत्तम पर्याय आहे. येथील शांत वातावरण आणि पाण्याने वेढलेले सुवर्ण मंदिराचे सौंदर्य हे लग्न समारंभासाठी एक सुंदर ठिकाण बनवते.
ओडिशाचे कोणार्क सूर्य मंदिर हे भारतातील सुंदर मंदिरांपैकी एक मानले जाते. हे शतकानुशतके जुने रथाच्या आकाराचे मंदिर 13 व्या शतकातील सुंदर आणि अप्रतिम वास्तुकला प्रतिबिंबित करते आणि लग्नासाठी योग्य ठिकाण असल्याचे सिद्ध होईल.