हा आहे भारताचा 'दुर्दैवी राजवाडा', 400 वर्षांपासून पडलाय ओसाड, शाहजहानच्या खास मित्राकडून बांधण्यात आला होता
भारत आपल्या ऐतिहासिक वस्तूंसाठी जगप्रसिद्ध आहे. भारतात अनेक प्राचीन किल्ले आहेत, ज्यांचा इतिहास खूप वर्षे जुना आहे. देशातील किल्ले इथला गौरवशाली इतिहास आणि भूतकाळातील योद्धांचे सामर्थ्य दर्शवतात. प्रत्येक किल्ल्यावर कोणत्या ना कोणत्या राजाने राज्य केले आहे. प्राचीन काळी बहुतेक राजे आणि सम्राट या किल्ल्यांमध्ये राहत असत आणि येथूनच शत्रूंशी युद्ध करत असत. मात्र आज आम्ही तुम्हाला देशातील अशा प्राचीन किल्ल्याचा इतिहास सांगणार आहोत जो 400 वर्षांपासून ओसाड पडला आहे.
गेल्या 400 वर्षांपासून येथे कोणीही राहत नाही, म्हणून याला ‘दुर्भाग्यपूर्ण पॅलेस’ असे म्हटले जाते. हा राजवाडा मध्य प्रदेशातील दतिया जिल्ह्यात वसलेला आहे. या किल्ल्याचे नाव सातखंडा महाल आहे. हे ठिकाण आपल्या अप्रतिम कलेसाठी प्रसिद्ध आहे. मात्र याचवेळी याला अशुभ देखील म्हटले जाते. दतियाचा सातखंडा पॅलेस इतकी वर्षे का उजाड आहे आणि यामागे नक्की कोणते करणं कारणीभूत आहे? याविषयी संपूर्ण इतिहास सविस्तर जाणून घेऊयात.
हेदेखील वाचा – ऑक्टोबर-मार्च दरम्यान फिरण्याचा विचार करताय? IRCTC कडून फ्लाइट तिकिटांवर मिळत आहे भरपूर सूट!
या महालाविषयी बोलणे केले तर, या महालात एकूण 440 खोल्या आहेत. तरीही 400 वर्षांपासून ते निर्जन राहिले आहे. हा राजवाडा दतियाचा राजा बीर सिंग यांनी 1620 मध्ये बांधला होता. त्यांनी जहांगीरच्या स्वागतासाठी हा भव्य राजवाडा उभारण्यात आला होता. राजा सलीम लहान असल्यापासून दोघांमध्ये मैत्री होती. जेव्हा बादशाह त्याचे वडील अकबर यांच्यासोबत सत्तेवर होते तेव्हा शाहजहानला सिंहासनावर बसवण्यात बीर सिंग देवने खूप मदत केली होती.
हेदेखील वाचा – या देशात फिरणे आहे पूर्णपणे मोफत, टुरिस्ट एक रुपयाही न करता करू शकतात ट्रॅव्हल
तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, या सुंदर सात मजली इमारतीमध्ये लाकूड किंवा लोखंडाचा वापर करण्यात आलेला नाही. हा महाल पूर्णपणे दगड आणि विटांपासून बनवण्यात आला आहे. त्यांच्या ताकदीमुळे राजवाडा इतकी वर्षे भक्कमपणे उभा आहे. असे म्हणतात की, ही सात मजली सुंदर इमारत फक्त एका रात्रीसाठी वापरली जात होती. यानंतर येथे कोणी राहिले नाही.
बीर सिंगदेव यांना दतिया जिल्हा भेट म्हणून देण्यात आला होता. याच कारणास्तव बीरसिंह देव किंवा त्यांच्या कुटुंबाने या महालाचा कधीही वापर केला नाही. असे म्हणतात की, एकदा सम्राट राजवाड्यात आला तेव्हा त्याने येथे एक रात्र मुक्काम केला. त्यामुळे सतखंडा राजवाडा वर्षानुवर्षे रिकामा आहे. एका रात्रीशिवाय येथे कोणीही राहिले नाही.