ट्रेनमध्ये TTE ने गैरवर्तन केल्यास असे सडेतोड उत्तर द्या, रेल्वेचे नियम देतील तुमची साथ
दररोज लाखो भारतीय रेल्वेने प्रवास करता असतात. रोजच्या प्रवासासाठी रेल्वे एक उत्तम, वेगवान आणि स्वस्त पर्याय आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वे अनेक सोई-सुविधा पुरवत असते. प्रवाशांचा प्रवास आरामदायी करण्यासाठी अनेक रेल्वे कर्मचारी नेहमीच आघाडीवर असतात, परंतु त्याच प्रवासादरम्यान जर एखादा कर्मचारी तुमच्याशी गैरवर्तन करत असेल तर काय करावे? अनेकदा सरकारी कामगिरी बघून लोक आवाज उठवत नाहीत पण तुम्हाला माहिती आहे का? रेल्वेने प्रवाशांसाठी काही नियम बनवले आहेत ज्यानुसार, प्रवाशांसोबत कोणत्याही अधिकाऱ्याने गैरवर्तन केल्यास प्रवासी त्याबाबत तक्रार नोंदवू शकतात. दररोज बातम्यांमध्ये अशा घटना ऐकायला मिळतात की रेल्वे कर्मचाऱ्यांनी किंवा टीटीईने प्रवाशांना वाईट वागणूक दिली. अशा परिस्थिती तुमच्यावर ओढवली तर काय करावे किंवा काय करता येईल ते आज आपण या लेखात जाणून घेणार आहोत.
दिल्लीतील चाणक्यपुरीचा हॉंटेड राजवाडा पहिलात का? भयानक आवाजांचा कहर अन् एका बेगमचा आत्मा फिरतोय इथे…
टीटीईचा व्हिडिओ बनवा
जर कोणताही टीटीई ट्रेनमध्ये कोणाशीही गैरवर्तन केले, मारहाण केली किंवा ढकला ढकली केली तर सर्वप्रथम प्रवाशाने पुराव्यासाठी त्याचा व्हिडिओ किंवा फोटो काढावा, अशा प्रकारे तुमच्याकडे पुरावा राहील. जर कोणताही टीटीई असे कोणतेही कृत्य करत असेल तर प्रवासी त्याच्याविरुद्ध तक्रार करू शकतात. यासाठी प्रथम त्याचे नाव आणि टीटीईच्या गणवेशावर लिहिलेली इतर माहिती लक्षात घ्यावी लागेल. तुम्हाला वेळ, ठिकाण, टीटीईचे नाव, बॅच नंबर किंवा आयडी नंबर लक्षात ठेवावा लागेल. तक्रार दाखल करण्यासाठी ही माहिती खूप उपयुक्त ठरते.
तक्रार कशी नोंदवायची?
प्रत्येक ट्रेनमध्ये गार्ड असतात, अशा परिस्थितीत तुम्हाला गार्डकडे जावे लागेल आणि लिखित स्वरूपात तक्रार नोंदवावी लागेल. तुम्ही तुमची तक्रार लेखी स्वरूपात गार्डकडे सादर करू शकता. जर तुम्हाला गार्ड मिळाला नाही, तर तुम्ही तुमची तक्रार जीआरपी आणि आरपीएफ कर्मचाऱ्यांकडे देखील करू शकता. जर तुम्हाला कोणताही सैनिक सापडला नाही, तर तुम्ही जवळच्या कोणत्याही स्टेशनवर उतरून दुसऱ्या कार्यालयात संपूर्ण प्रकरणाची तक्रार दाखल करू शकता.
रेल्वे हेल्पलाइनवर करू शकता कम्प्लेंट
तक्रार नोंदवण्यासाठी तुम्ही रेल्वेच्या हेल्पलाइन नंबरची मदत घेऊ शकता. या हेल्पलाइन नंबरवर कॉल करून तुम्हाला तक्रार करता येईल. यासाठी रेल्वे हेल्पलाइन क्रमांक १३९ वर कॉल करा. अशा प्रकारे तुम्ही एका कॉलवरूनही तुमची तक्रार नोंदवू शकता. शिवाय तुम्ही रेल्वे सुरक्षा हेल्पलाइन १८२ नंबरवर देखील तुमची तक्रार करू शकता. इतकेच नाही तर तुम्ही रेल्वे हेल्पद्वारेही तक्रार करू शकता.