Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 7 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Holi 2025: भारतात या भागांत खेळली जात नाही होळी; इथली लोक रंगांना हातही लावत नाहीत

होळी हा रंगांचा, आनंदाचा उत्सव तथापि देशात अशी काही ठिकाणे आहेत जिथे लोकांनी अनेक वर्षांपासून होळी साजरी केलेली नाही. हा सण न साजरा करण्यामागे अनेक कारणे आहेत, ज्याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.

  • By नुपूर भगत
Updated On: Mar 14, 2025 | 08:50 AM
Holi 2025: भारतात या भागांत खेळली जात नाही होळी; इथली लोक रंगांना हातही लावत नाहीत

Holi 2025: भारतात या भागांत खेळली जात नाही होळी; इथली लोक रंगांना हातही लावत नाहीत

Follow Us
Follow Us:

होळी हा रंगांचा सण आहे जो देशभरात मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. दरवर्षी हा उत्सव फाल्गुन महिन्यातील पौर्णिमेला साजरा केला जातो. याच क्रमाने यंदा 14 मार्च रोजी होळी साजरी केली जाणार आहे. हा हिंदू धर्मातील प्रमुख सणांपैकी एक आहे, जो देशात वेगवेगळ्या प्रकारे साजरा केला जातो. वसंत ऋतूच्या स्वागतासाठी होळी हा सण खेळाला जातो. हा सण मनातील वाईट भावना मिटवून टाकून नव्याची सुरुवात करण्याचा सल्ला देतो. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण होळीच्या सणाचा आनंद लुटतात, असं क्वचितच कोणी असेल ज्याला होळी खेळायला आवडत नाही. पण तुम्हाला माहित आहे का की भारतात काही ठिकाणे अशी आहेत जिथे लोकांनी अनेक वर्षांपासून होळी खेळली गेली नाही.

होळी खेळणे विसरा, या ठिकाणी लोकांनी खूप दिवसांपासून रंगांना स्पर्शही केलेला नाही. होळीचा सण साजरा न होण्यामागे कुठेतरी पौराणिक कथा, कुठे ऐतिहासिक घटना किंवा सांस्कृतिक श्रद्धा कारणीभूत आहेत. अशा परिस्थितीत, आज या लेखात देशाच्या कोणकोणत्या भागात होळीचा सण साजरा केला जात नाही ते जाणून घेणार आहोत.

Holi 2025: बाजारातील रासायनिक रंग विसरा! नैसर्गिक पदार्थांपासून घरीच तयार करा 100% ऑर्गेनिक कलर्स

महाबलीपुरम, तमिलनाडु

तमिळनाडूच्या महाबलीपुरम शहरात आजवर होळी साजरी केली गेली नाही. होळी खेळण्याऐवजी येथील लोक मासी मगम नावाचा धार्मिक विधी करतात. येथील लोकांची श्रद्धा आहे की या दिवशी स्वर्गात असलेले आत्मा आणि देवी-देवता पृथ्वीवर येतात. त्यामुळे होळीच्या दिवशी रंग खेळण्याऐवजी येथे पूजा आणि धार्मिक विधी केले जातात.

रुद्रप्रयाग, उत्तराखंड

उत्तराखंडमध्ये एक असे ठिकाण आहे, जे पर्वत आणि सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे, जिथे होळीचा सण साजरा केला जात नाही. किंबहुना, रुद्रप्रयाग जिल्ह्यातील क्विली आणि कुरझान गावांमध्ये अशी श्रद्धा आहे की त्रिपुरा सुंदरीला आवाज अजिबात आवडत नाही. त्यामुळे देवीचे हे स्वरूप लक्षात घेऊन येथे होळी साजरी केली जात नाही.

गोवा नाही तर भारतातील या समुद्रकिनाऱ्याला मिळाला आशियातील सर्वोत्कृष्ट बीचचा किताब, तुम्ही भेट दिलीत का?

रामसन, गुजरात

गुजरातमध्येही एक गाव आहे, जिथे गेल्या 200 वर्षांपासून कोणीही होळीचा सण साजरा केला नाही. राज्यात बनासकांठा जिल्ह्यातील रामसन गावात होळी खेळण्यास बंदी आहे. वास्तविक, यामागे एक शाप आहे. स्थानिक लोकांच्या मान्यतेनुसार, एका राजाच्या चुकीच्या कृतीमुळे संतप्त झालेल्या काही संतांनी गावाला शाप दिला होता की येथे होळी साजरी केली तर वाईट वेळ येईल.

दुर्गापुर, झारखंड

झारखंडमधील बोकारो जिल्ह्यात एक गाव आहे, जिथे होळी खेळण्यास पूर्णपणे मनाई आहे. येथील दुर्गापूर गावात शंभर वर्षांपूर्वी घडलेल्या एका घटनेमुळे या दिवसांत होळी साजरी होत नाही. या गावातील राजाचा मुलगा होळीच्या दिवशी मरण पावला, त्यानंतर राजाने दु:खी होऊन होळी न साजरी करण्याचा आदेश दिला, असे स्थानिकांचे मत आहे. इतकंच नाही तर नंतर स्वतः राजाही होळीच्या दिवशी मरण पावला. त्यामुळे आजपर्यंत लोक राजाच्या या आदेशाचे पालन करत आहेत.

Web Title: In these indian regions holi is not celebrated know the reason travel news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 14, 2025 | 08:48 AM

Topics:  

  • holi
  • Holi 2025
  • travel news

संबंधित बातम्या

Travel News : पिंकपासून ब्लू आणि ऑरेंजपर्यंत… या ठिकाणांच्या नावात दडलीये रंजक कहाणी
1

Travel News : पिंकपासून ब्लू आणि ऑरेंजपर्यंत… या ठिकाणांच्या नावात दडलीये रंजक कहाणी

Navratri 2026 : या ठिकाणी आहेत देवीच्या 9 रूपांची मंदिरे, नवरात्रीत भरते भक्तांची गर्दी
2

Navratri 2026 : या ठिकाणी आहेत देवीच्या 9 रूपांची मंदिरे, नवरात्रीत भरते भक्तांची गर्दी

हनिमूनसाठी कुठे जावं? बर्फापासून समुद्रकिनाऱ्यापर्यंत हे रोमँटिक ठिकाण ठरतात कपल्सची पहिली पसंत
3

हनिमूनसाठी कुठे जावं? बर्फापासून समुद्रकिनाऱ्यापर्यंत हे रोमँटिक ठिकाण ठरतात कपल्सची पहिली पसंत

फेस्टिव्ह सिजनमध्ये रेल्वेने प्रवास करताय? 1 ऑक्टोबरपासून लागू झालेत हे नवे नियम
4

फेस्टिव्ह सिजनमध्ये रेल्वेने प्रवास करताय? 1 ऑक्टोबरपासून लागू झालेत हे नवे नियम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.