(फोटो सौजन्य: Pinterest)
होळी हा सण आता जवळ आला आहे, हिंदू धर्मातील प्रमुख सणांपैकी हा एक सण आहे. रंगानी सजलेला हा सण आनंदाचे आणि उत्साहाचे प्रतीक मानले जाते. आजकाल अधिकतर लोक सणानिमित्त बाजारातून रसायनयुक्त रंग खरेदी करत असतात मात्र हे रंग आपल्या त्वचेसाठी आणि केसांसाठी फार हानिकारक ठरत असतात. यातील रासायनिक घटकांमुळे त्वचेवर खाज, जळजळ आणि ॲलर्जी यांसारख्या समस्या उद्भवू शकतात. बाजारात उपलब्ध असलेल्या स्वस्त रंगांमध्ये शिसे, पारा, सिलिका आणि इतर हानिकारक रसायने मिसळले जातात. यामुळे त्वचेवर पुरळ, खाज आणि ऍलर्जी होऊ शकते.
काही रंग तर इतके विषारी असतात की त्यामुळे डोळ्यांची जळजळ होते आणि केस गळतात. अशात तुम्हाला माहिती आहे का? तुम्ही हे रंग घरीदेखील अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने तयार करू शकता. घरी बनवलेल्या हर्बल कलर्सने तुम्ही तुमची होळी आणखीन मजेदार आणि सुरक्षित बनवू शकता. असे करून तुम्ही स्वतःचा, इतरांचा तसेच पर्यावरणाचाही फायदा करू शकता. मुख्य म्हणजे यात तुमचे कोणतेही अतिरिक्त पैसे खर्च होणार नाही, तुम्ही अगदी घरगुती आणि नैसर्गिक पदार्थांपासूनच हे रंग तयार करू शकता. चला तर मग हे रंग घरी कसे तयार करायचे ते जाणून घेऊया.
Holi 2025: केवळ भारतातच नाही या देशांमध्येही जल्लोषात साजरी केली जाते ‘होळी’
गुलाबी किंवा लाल रंग
बीटाचा लाल चटकेदार रंग तुम्हाला रंग बनवण्यासाठी कामी येऊ शकतो. यासाठी बीटरूटचे छोटे तुकडे करून उन्हात वाळवा. सुकल्यानंतर मिक्सरमध्ये बारीक वाटून त्याची बारीक पावडर बनवा. आता त्यात ॲरोरूट पावडर टाका म्हणजे रंग मऊ होईल.
हिरवा रंग
हिरवा रंग तयार करण्यासाठी आपण पालकचा वापर करू शकतो. यासाठी ताजी पालक वाळवून त्याची पावडर बनवा. त्यात ॲरोरूट समान प्रमाणात मिसळून मऊ गुलाल तयार करा. यासाठी मेहंदी पावडर देखील वापरली जाऊ शकते, परंतु हे लक्षात ठेवा की ते नैसर्गिक असावे.
पिवळा रंग
तुम्हाला माहिती आहे का? हळद पावडरमध्ये बेसन मिसळून पिवळा रंग तयार केला जाऊ शकतो. हळदीमध्ये अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात, जे त्वचेसाठी फायदेशीर असतात.
निळा रंग
निळा रंग तयार करण्यासाठी तुम्ही गुलमोहराच्या निळ्या फुलांचा वापर करू शकता. यासाठी फुले वाळवून त्याची मिक्सरमध्ये पावडर बनवा. मग त्यात ॲरोरूट टाकून सुरक्षित रंग तयार करा.
नैसर्गिक रंगांचा फायदा