महाकुंभमेळ्याला जाणाऱ्यांसाठी IRCTC चे उत्तम टूर पॅकेज; जाणून घ्या काय असतील सुविधा?
महाकुंभ मेळा 2025 काही दिवसांत सुरू होणार आहे. महाकुंभ मेळाव्याची तयारी जोमाने सुरू आहे. महाकुंभ हा हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा धार्मिक उत्सव आहे, जो दर 12 वर्षांनी गंगा, यमुना आणि सरस्वतीच्या संगमावर आयोजित होतो. धार्मिक मान्यतेनुसार, महाकुंभमध्ये संगमात स्नान केल्याने सर्व पाप नष्ट होतात आणि मोक्ष प्राप्त होतो. त्यामुळे लाखो भाविक या पवित्र प्रसंगी संगमावर स्नान करण्यासाठी येतात. जर तुम्ही हा पवित्र मेळा पाहण्याचा विचार करत असाल, तर IRCTCच्या या खास टूर पॅकेजचा लाभ घेऊ शकता.
यावर्षी महाकुंभ मेळ्याचे आयोजन प्रयागराज येथे 13 जानेवारी 2025 पासून 26 फेब्रुवारी 2025 पर्यंत होणार आहे, जिथे सुमारे 40 कोटी श्रद्धाळू सहभागी होतील. यासाठी IRCTC प्रयागराज, अयोध्या आणि वाराणसीचा समावेश असलेले विशेष टूर पॅकेज आणले आहे.
कुंभ स्पेशल टूर पॅकेजचे तपशील
या पॅकेजचे नाव “Kumbh special-Varanasi Prayagraj & Ayodhya” आहे. या टूर या टूर पॅकेजअंतर्गत 5 रात्री आणि 6 दिवसांचा प्रवास समाविष्ट आहे. या पॅकेजची सुरुवात 19 जानेवारी 2025 रोजी मुंबईहून होईल. ही हवाई प्रवासावर आधारित योजना असून यामध्ये तुम्हाला प्रयागराज, वाराणसी आणि अयोध्या या धार्मिक स्थळांना भेट देता येईल.
रिटायरमेंटनंतर फिरायला जाण्याचा प्लॅन करताय; मग भारतातील ‘या’ ठिकाणांना नक्की भेट द्या
फोटो सौजन्य: सोशल मीडिया
पॅकेजमधील सुविधा
प्रयागराज, वाराणसी आणि अयोध्या या तीनही शहरांमध्ये विमानतळावर पोहोचल्यानंतर तुम्हाला पुढील प्रवास कॅब किंवा बसने करता येईल. संपूर्ण प्रवासादरम्यान तुम्हाला निवास, भोजन आणि प्रवास याची आयआरसीटीसीकडून व्यवस्था केली जाणार आहे. प्रवाशांना हॉटेलमध्ये आरामदायी राहण्याची सुविधा मिळेल. त्यामुळे तुम्हाला कोणत्याही गोष्टीची काळजी करण्याची गरज नाही. कुटुंब किंवा मित्रांसह धार्मिक पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी हे पॅकेज एक उत्कृष्ट संधी आहे.
किती असेल भाडे?
या विशेष टूर पॅकेजसाठी एका व्यक्तीसाठी भाडे ₹77,400 आहे. दोन प्रवासी एकत्र प्रवास करत असल्यास प्रति व्यक्ती भाडे ₹49,600 असेल, तर तीन प्रवासी एकत्र प्रवास केल्यास प्रति व्यक्ती भाडे ₹43,400 असेल. आयआरसीटीसीचे हे पॅकेज महाकुंभ मेळ्यात सहभागी होण्यासोबतच वाराणसी आणि अयोध्यासारख्या ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांना भेट देण्यासाठी उत्तम पर्याय ठरेल. यात्रा दरम्यान हॉटेल, भोजन आणि प्रवासाच्या सुविधा उपलब्ध असल्याने हा प्रवास आरामदायी होईल. त्यामुळे जर तुम्हाला महाकुंभ मेळ्याचा पवित्र अनुभव घ्यायचा असेल, तर या पॅकेजचा विचार नक्की करा.