फोटो सौजन्य: iStock
नवीन वर्षाला सुरु होण्यास अवघे काही दिवसच उरले आहेत. अनेकजण सध्या फिरायला जाण्याचे प्लॅन करत आहेत. तुम्ही देखील असाच प्लॅन करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. आपल्या दक्षिण भारतातील राज्ये नैसर्गिकसौंदर्यासाठी खूप प्रसिद्ध आहेत. कोणताही ऋतू असो, ही ठिकाणे प्रवासासाठी लोक कायमच्या लोकांच्या पसंतीस उतरत असतात. दरवर्षी निसर्गाच्या सान्निध्यात वेळ घालवण्यासाठी, दैनंदिन ताणतणाव दूर करण्यासाठी भेट देण्यास लाखो पर्यटक येतात. जर तुम्हीही नवीन वर्षाच्या सुरूवातीला अशाच एका सुंदर ठिकाणी प्रवासाची योजना आखत असाल, तर IRCTC ने तुमच्यासाठी खास टूर पॅकेज आणले आहे.
या पॅकेजद्वारे तुम्ही केरळ राज्याची सफर आरामात आणि निश्चिंतपणे करू शकता. या पॅकेजची सुरुवात 2025 च्या जानेवारीत होणार आहे, यामुळे नवीन वर्षाचा आनंद केरळमध्ये घेणे हा एक खास अनुभव ठरेल. केरळला देवभूमी म्हणूनही ओळखले जाते. सर्दीच्या हंगामात विशेषत: अद्भुत दृश्य पाहायला मिळतात. IRCTC ने तयार केलेल्या “Celestial Kerala Tour” या टूर पॅकेजमध्ये तुम्ही 6 दिवस आणि 5 रात्रींची प्रवासयोजनेचा आनंद घेऊ शकता.
पॅकेज डिटेल्स
या पॅकेजचा कोड WMA41C असून प्रवासाची सुरुवात 12 जानेवारी 2025 रोजी मुंबईवरून होणार आहे. मुंबईहून कोच्चीपर्यंत प्रवास एअर इंडियाच्या फ्लाइटद्वारे केला जाईल. या पॅकेजमध्ये तुम्हाला मट्टनचेरी पॅलेस, चहा संग्रहालय, फोर्ट कोच्ची बीच, सांस्कृतिक कार्यक्रम, पेरियार अभयारण्य, मट्टुपेट्टी धरण आणि अन्य आकर्षक ठिकाणांना भेट देण्याची संधी मिळेल. राहण्याची व्यवस्था तीन स्टार हॉटेलमध्ये असून सकाळचा नाश्ता आणि रात्रीचे जेवणही या पॅकेजमध्ये समाविष्ट आहे. याशिवाय, अनुभवी ट्रॅव्हल गाईड आणि 60 वर्षांवरील वयाच्या व्यक्तींना विमा संरक्षण देखील दिले जाईल.
पॅकेजसाठी भाडे:
यामध्ये एका व्यक्तीसाठी 56,500 रुपये आहेत, तर डबल शेअरिंगसाठी प्रति व्यक्ती 43,500 रुपये. तसेच तीन जणांसाठी प्रति व्यक्ती 42,200 रुपये आहेत. याशिवाय 5 ते 11 वर्षांच्या मुलांसाठी भाडे 38,300 रुपये.
हा प्रवास केवळ आर्थिकदृष्ट्या परवडणारा नाही तर आरामदायकही आहे. केरलच्या सौंदर्याचा आस्वाद घेण्यासाठी आणि निसर्गाच्या सान्निध्यात वेळ घालवण्यासाठी ही एक उत्तम संधी आहे. बुकिंगसाठी IRCTC च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या. अधिक माहिती आणि अटी-शर्तीही ऑनलाइन उपलब्ध आहेत. तर, 2025 मध्ये IRCTC च्या या खास पॅकेजसोबत केरलचा आनंद लुटा आणि एक अविस्मरणीय अनुभव घ्या.