अलीकडे धावपळीच्या काळात लोकांना स्वत:साठी पाच मिनिटे देखील मिळत नाही. याबदलत्या जीवनशैलीमुळे अनेकांना कुठे फिरायला जायचे असेल तर ते शक्य नसते. मग अनेकजण रिटायरमेंटनंतर जाऊ असे ठरवतात. पण अनेकदा कमी बजेट असल्याने ते देखील शक्य होत नाही. पण तुम्ही, रिटायरमेंटनंतर शांत, सुंदर, आणि बजेट-फ्रेंडली ठिकाणी फिरायला जाण्याचा प्लॅन करत असाल तर भारतात अनेक पर्याय उपलब्ध आहेत. भारतातील ही ठिकाणं निसर्गसौंदर्याने परिपूर्ण असून शांतता आणि मजा अनुभवण्यासाठी परफेक्ट आहेत. येथे तुम्ही कमी खर्चात सुंदर आणि विलोभनीय अनुभव घेऊ शकता. (फोटो सौजन्य: )
रिटायरमेंटनंतर फिरायला जाण्याचा प्लॅन करताय; मग भारतातील 'या' ठिकाणांना नक्की भेट द्या
केरळचं हिरवंगार वातावरण, बॅकवॉटर, आयुर्वेदिक ट्रीटमेंट आणि स्वादिष्ट सी-फूड रिटायरमेंटनंतरचा अनुभव संस्मरणीय करेल. हाऊसबोटमध्ये सैर, योगा, ध्यान, आणि स्थानिक संस्कृतीचा आनंद घेण्यासाठी केरळ हे उत्तम ठिकाण आहे
गोवा म्हणजे सुंदर समुद्रकिनारे, वॉटर स्पोर्ट्स, लाईव्ह म्युझिक, आणि स्वादिष्ट फूडचा आनंद. गोव्यात बजेट हॉटेल्स आणि स्थानिक बस किंवा टॅक्सीने फिरण्याचे अनेक पर्याय आहेत
हिमाचल प्रदेशातील हिमाच्छादित पर्वत, हिरव्या दऱ्या, शांत मंदिरे, आणि साहसी क्रिडांचा अनुभव तुम्हाला निसर्गाच्या अगदी जवळ नेईल
काश्मीरची नयनरम्य सौंदर्य, डल लेकवरची शिकारा राईड, बगीच्यांमधील फिरणे, आणि कश्मीरी खाद्यपदार्थ तुम्हाला स्वर्गसुखाचा अनुभव देतील
राजस्थानातील जयपूर, उदयपूर, जोधपूर, आणि जैसलमेरमधील किल्ले, महाल, आणि हवेल्या तुम्हाला इतिहासाची आणि राजेशाही संस्कृतीची झलक दाखवतील
उत्तराखंडातील ऋषिकेश, हरिद्वार, बद्रीनाथ, आणि केदारनाथसारखी ठिकाणं तुम्हाला आध्यात्मिक उन्नतीचा अनुभव देतील. निसर्ग आणि श्रद्धेचा संगम येथे अनुभवता येईल
मेघालयातील हिरव्यागार दऱ्या, लिव्हिंग रूट ब्रिज, गुफा, आणि धबधबे तुम्हाला अद्वितीय अनुभव देतील. शिलॉंग आणि चेरापुंजी ही ठिकाणं आवर्जून पाहा
ओडिशामधील कोणार्क मंदिर, पुरी समुद्रकिनारा, आणि भुवनेश्वरमधील ऐतिहासिक स्थळं तुम्हाला मंत्रमुग्ध करतील
तमिळनाडूमधील मदुराई, चेन्नई, कुंभकोणम, आणि ऊटीसारख्या ठिकाणी संस्कृती, कला, आणि निसर्गाचा अनोखा मिलाप पाहायला मिळतो
वाराणसी म्हणजे अध्यात्मिक शांतीचं प्रतीक. गंगा आरती, घाटांवरील फिरणे, आणि स्थानिक स्ट्रीट फूडचा आनंद घेण्यासाठी ही जागा सर्वोत्तम आहे