Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

इटलीच्या समुद्रतळाशी दडलेलं अनोखं शहर पुन्हा प्रकाशात; ज्वालामुखीमुळे झाले होते उद्ध्वस्त

पृथ्वीवर अशा अनेक गोष्टी आहेत, ज्यांचा शोध मानवाला आश्चर्यचकित करत आहे. अनेक अशा रहस्यमयी गोष्टींचा उलगडा होत आहे, ज्याची मानवाने कल्पना देखील केली नसेल.

  • By स्वराली शहा
Updated On: Jul 12, 2025 | 11:23 PM
Italy's sunken city destroyed by a volcano returning from the sea

Italy's sunken city destroyed by a volcano returning from the sea

Follow Us
Close
Follow Us:

रोम : पृथ्वीवर अशा अनेक गोष्टी आहेत, ज्यांचा शोध मानवाला आश्चर्यचकित करत आहे. अनेक अशा रहस्यमयी गोष्टींचा उलगडा होत आहे, ज्याची मानवाने कल्पना देखील केली नसेल. दरम्यान इटलीमध्ये पुरातत्व संशोधकांना आणखी एक महत्वपूर्ण शोध लागला आहे. इटलीत दोन हजार वर्षापूर्वी एक शहर समुद्राने गिळंकृत केले होते. हे इटलीचे ऐतिहासिक शहर होते. आता ऐनारिया नावाचे हे शहर पुन्हा एकदा जगासमोर येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, इ. स. पूर्व 180 मध्ये क्रेटिओ ज्वालामुखीचा उद्रेक झाला होता. या ज्वामुखीच्या उद्रेकामुळे हे शहर समुद्रात बुडाले होते. दरम्यान या शहराचा इस्चिया बेटाजवळील कार्टारोमाना उपसारगात स्थित एका प्राचीन रोमन बंदर नगरीचा भाग होता. आता हा पुरातत्व उत्खननाचा भाग जलपर्यटनाच्या माध्यमातून पाहता येतो.

काचेच्या बोटींगमधून पाहता अद्भुत दृश्यांचे दर्शन

बीबीसीने दिलेल्या वृत्तानुसार, या शहराचे अवशेष आता पाण्याखालून पाहत येणार आहेत. पर्यटक काचेच्या तळाच्या नावेतून किंना स्नार्कलिंगद्वारे हे पाहू शकणार आहेत. प्राचीन घाट, रोमन स्थापत्यकला, कलाकृती, आणि समुद्रतळाशी असलेली इमारत काचेच्या बोटीतून पाहता येणार आहे. विशेष करुन इतिहासप्रेमी लोकांसाठी ही ठिकाण साहसी आणि आकर्षक अनुभव ठरत आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- पाकिस्तानमध्ये अंतर्गत कुरखोडीने वाढणार ताण; बलुच आर्मीने सुरु केले ऑपरेशन ‘BAAM

आर्थिक आणि  ऐतिहासिक संशोधनाला चालना

१९७० च्या दशकात या शहराच्या काही अवशेष गोताखोरांना सापडले होते. यामध्ये किनाऱ्यावर मातीची भांडी आणि पिंड सापडले होते. २०११ मध्ये अधिक पुरावे शोधले गेले. यामध्ये रोमन घाट, मोजेतक, अम्फोरा, जुनी नाणी आणि लाकडी जहाजे सापडली. यातून अनेक भूमध्यसागरी व्यापार झाले असल्याचे पुरावे देखील सापडले. यामुळे येथे खऱ्या अर्थाने आर्थिक आणि  ऐतिहासिक संशोधनाला चालना मिळाली. सध्या या शोधांवरुन रोमन लष्करी मोहिमांमध्ये ऐनारियाची भूमिका असल्याचे पुरावे मिळाले आहेत.

बीबीसीने दिलेल्या अहवालानुसार, हे शहर ग्रीस वसाहतींसाठी प्रसिद्ध होते. त्यानंतर रोमन साम्राज्यात या बेटाला सामील करण्यात आले आणि ऐनारिया असे नाव ठेवण्यात आले. परंतु या ठिकाणी रोमन शहराच्या अस्तित्वाबद्दल शंका व्यक्त केली जात होती. संशोधकांनी दिलेल्या माहितीनुसार, कोणत्याही रोमन लेखनात या शहराचा उल्लेख नव्हता. केवळ ज्वालामुखीच्या राखेखाली एक दबलेले शहर म्हणून याचा उल्लेख मिळाला आहे.

पुरातत्व शास्त्रज्ञ डॉ. अलेस्सांद्रा बेनिनी यांनी म्हटले की, ऐनारिया केवळ एक व्यापारी आणि रहिवासी केंद्र होते. सध्या येथील जलपर्यटनाद्वारे नवे शिकण्याची आणि पुरातत्व उत्खनन पाहण्याची संधी मिळणार आहे.तसेच ३डी व्हिडिओद्वारे देखील हे शहर पाहता येणार आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या – पाकिस्तानमध्ये राजकारण तापले; माजी पंतप्रधान इम्रान खानच्या मुलांवर अटकेची टांगती तलवार, प्रकरण काय?

Web Title: Italys sunken city destroyed by a volcano returning from the sea

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 12, 2025 | 11:23 PM

Topics:  

  • World news

संबंधित बातम्या

भारत-पाकिस्तान संघर्षासह या पाच मुद्द्यांवर UNGA मध्ये ट्रम्प यांनी केले खोटे दावे? अमेरिकन माध्यमांनीच केले तथ्य उघड
1

भारत-पाकिस्तान संघर्षासह या पाच मुद्द्यांवर UNGA मध्ये ट्रम्प यांनी केले खोटे दावे? अमेरिकन माध्यमांनीच केले तथ्य उघड

Gen Z शब्दांना मिळाला मान! WFH, Dashcam सारख्या तब्बल 5000 नवीन शब्दांचा ‘या’ डिक्शनरीत समावेश
2

Gen Z शब्दांना मिळाला मान! WFH, Dashcam सारख्या तब्बल 5000 नवीन शब्दांचा ‘या’ डिक्शनरीत समावेश

‘ते आम्हाला तालिबानसारखे दाखवत आहेत’ ; मोहम्मद युनूस यांचे भारतावर गंभीर आरोप
3

‘ते आम्हाला तालिबानसारखे दाखवत आहेत’ ; मोहम्मद युनूस यांचे भारतावर गंभीर आरोप

परदेशी लोकांनाही नवरात्रीची भुरळ; थायलंडमध्ये विधी, पौराणिक कथा अन् देवीसमोर तांडव नृत्य सादर, VIDEO
4

परदेशी लोकांनाही नवरात्रीची भुरळ; थायलंडमध्ये विधी, पौराणिक कथा अन् देवीसमोर तांडव नृत्य सादर, VIDEO

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.