रेल्वेने प्रवास करताय... मग लाल अन् निळ्या डब्यात काय फरक असतो माहिती आहे का? जाणून घ्या
देशातील बहुतेक लोक हे आपल्या रोजच्या जीवनात रेल्वेने प्रवास करतात. नोकरदार वर्गासाठी तर रेल्वेचा प्रवास त्यांच्या आयुष्याचा एक मूळ भागच बनला आहे. रेल्वेचा प्रवास हा सर्वात सोयीस्कर आणि कमी खर्चाचा प्रवास मानला जातो. तुम्ही सर्वांनी कधी ना कधी रेल्वेचा प्रवास केला असेलच. प्रवासादरम्यान आपल्याला निळ्याआणि लाल रंगाचे डब्बे गाडीला जोडलेले पाहायला मिळतात. आता हे डब्बे वेगवगेळ्या रंगात का असतात आणि यात नेमका फरक काय आहे तुम्हाला माहित आहे का? नाही तर आजच्या या लेखातून जाणून घ्या.
रेल्वेच्या प्रवासादरम्यान तुम्ही नक्कीच रेल्वे गाडीला निळ्या आणि लाल रंगाचे डबे जोडलेले पाहिले असावेत. हे डबे सारखेच असून यात कोणताही फरक नसेल असे आपल्याला वाटते मात्र हे खरं नाही. हे दोन्ही डबे एकमेकांहून वेगळे असून दोन्ही डबे वेगळ्या ठिकाणी आणि वेगळ्या तंत्रज्ञानाचा वापर करून बनवले जातात. निळा डब्बा असलेली ट्रेन चेन्नईमध्ये बनते. हीच लाल डब्याची ट्रेन पंजाबमध्ये बनवली आहे. या डब्यांच्या रागांव्यतिरिक्त यात अजूनही भिन्नता आहे. यांच्यातील फरक जाणून घेऊयात.
भारतीय गाड्यांच्या निळ्या डब्यांना इंटिग्रल कोच (ICF) असे म्हटले जाते. ICF कोच हा एक पारंपारिक रेल्वे कोच आहे जो ICF (इंटिग्रल कोच फॅक्टरी), पेरांबूर, चेन्नई, भारत द्वारे डिझाइन आणि विकसित केला आहे. निळ्या रंगाच्या ICF (इंटिग्रल कोच फॅक्टरी) कोचचे उत्पादन 1952 मध्ये सुरू झाले. हे चेन्नई, तामिळनाडू येथे स्थित इंटिग्रल कोच फॅक्टरी (ICF) मध्ये तयार केले जाते.
हेदेखील वाचा – 3 वर्षे रात्रंदिवस काम करत राहिले 9 हजार मजूर तरीही हिटलरच्या आलिशान हॉटेलचे स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही…
लाल रंगाचे डबे हे LHB डबे आहेत. हे जर्मनीच्या लिंक-हॉफमन-बुश यांनी तयार केले होते. मात्र, आता हे डबे फक्त भारतातच बनवले जातात. लाल रंगाच्या डब्यांची निर्मिती 2000 साली सुरू झाली. हे जर्मन कंपनी Linke Holf Busch (M/S ALSTROM Linke Holf Busch Germany) ने डिझाइन केले आहे. हे डबे रेल्वे कोच फॅक्टरी कपूरथला येथे बनवले आहेत.
तसे पाहायला गेले तर प्रत्येक व्यक्ती लाल आणि निळ्या रंगाचे डबे असलेल्या ट्रेनने प्रवास करतो. मात्र यातील लाल रंगाचे डबे असलेली ट्रेन अधिक सुरक्षित मानली जाते. निळ्या रंगाच्या कोच ट्रेनमध्ये ड्युअल बफर सिस्टीम आहे, ज्यामध्ये अपघातानंतर डबे एकाच्या वर चढतात. तर लाल रंगाचे डबे असलेल्या ट्रेनमध्ये सिंगल बफर सिस्टिम आहे. यामध्ये अपघात झाल्यानंतर कंपार्टमेंट एकमेकांवर आदळत नाहीत. ज्यामुळे कोणतीही जीवित हानी होण्याचा धोका आणि मालमत्तेचे नुकसान होण्याचा धोका कमी होतो.