Maa Phire Museum Kolkata
शारदीय नवरात्रीच्या पवित्र सणाचा आज सहावा दिवस आहे. हिंदू धर्मातील प्रमुख सणांपैकी एक सण जो अश्विन महिन्यात साजरा करण्यात येतो. हा सण नऊ दिवसांचा असतो. यावेळी दुर्गा मातेच्या नऊ रूपांची पूजा केली जाते. या दिवसांत लोक 9 दिवसांचे व्रतही करतात. याशिवाय या 9 दिवसांमध्ये देवीच्या दर्शनासाठी मंदिरांमध्ये भाविकांची मोठी गर्दी जमते. जरी भारतात हा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जात असेल तरी कोलकाता दुर्गा मातेच्या या नवरात्रीच्या उत्सवासाठी जगभरामध्ये खूप प्रसिद्ध आहे.
पण तुम्हाला माहित आहे का, कोलकाताची आणखी एक खास गोष्ट म्हणजे येथे नवरात्रीच्या सणानंतरही दुर्गा मातेच्या मूर्ती जपल्या जातात. हो या शहरात दुर्गा मातेचे खास संग्रहालय आहे जिथे माता दुर्गेच्या मूर्ती प्रदर्शित केल्या जातात. कोलकातामध्ये दुर्गा उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. नवरात्री हा सण येथील लोकांना एकत्र आणतो आणि परंपरेशी जोडून ठेवतो. हा सण म्हणजे कला, संस्कृती आणि श्रद्धा यांचा एक अद्धभुत संगम आहे.
कला आणि परंपरेशी जोडून ठेवणारे अद्भुत संग्रहालय
कोलकातामध्ये दुर्गा मूर्तीला केवळ धार्मिक महत्त्वच दिले जात नाही, तर मातेच्या मूर्ती कलेचे एक अद्भुत अदाहरण देखील आहे. या मूर्तीचा मागे प्रत्येक कलाकार सर्जनशीलता आणि कौशल्य आणि त्याची मेहनत असेत. त्यामुळे कोणीही भक्त देवीची मूर्ती पाहताच मंत्रमुग्ध होऊन जातो. दुर्गा मातेच्या या मूर्ती जपण्यासाठी कोलकाताचे हे म्यूझियम एक महत्त्वाचे आहे. या म्यूझियमचे नाव Maa Phire Elo Museum असे आहे. जिथे मातेच्या मूर्ती ठेवण्यात येतात ज्यामुळे जगभरातील लोकांना या मूर्ती पाहण्याचा आनंद घेता येईल.
हे म्यूझियम कोलकाताच्या दक्षिण भागात शांत आणि सुंदर परिसरात वसलेले आहे. या संग्रहालयाची स्थापना 2012 मध्ये करण्यात आली होती. ‘मा फिरे एलो’ संग्रहालयात कोलकात्यातील प्रसिद्ध पंडालमधील दुर्गा मातेच्या काही अद्भुत कलाकृती आणि शिल्पे जतन करण्यात आली आहेत. याशिवाय संग्रहालयात केवळ तुम्हाला आकर्षक टेराकोटा निर्मिती आणि आणखी काही कला पाहायला मिळतील. तुम्हाला जर कोलकातच्या दुर्गा पूजेचा वारसेचा अनुभव घ्यायचा असेल तर या संग्रहालयाला नक्की भेट द्या. कोलकाताचा दुर्गा उत्सव हा एक अनोखा अनुभव आहे. या शहरात 4 हजाराहूंन अधिक दुर्गा मातेच्या भव्य मूर्तींची स्थापा करण्यात येते. त्यांची थाटामाटात पुजा केली जाते.