कोलकाता: कोलकाता येथील लॉ कॉलेजमध्ये एका तरुणीवर बलात्कार घडल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या कॉलेजमध्ये शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याने आणि दोन माजी विद्यार्थ्यांनी हा अत्याचार केल्याचे समोर आले आहे. आरोपीना कोर्टाने मंगळवारपर्यन्त पोलिस कोठडी सुनावली आहे. दरम्यान या प्रकरणात आता पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे.
कोलकाता पोलिसांनी या बलात्कार प्रकरणात मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणात लॉ कॉलेजच्या सुरक्षारक्षकाला अटक करण्यात आली आहे. तर या आधी चार आरोपीना अटक करण्यात आली आहे. यामध्ये एका तृणमूल कॉँग्रेसच्या नेत्याचा समावेश असल्याचे समोर आले आहे.
नक्की काय घडले?
कोलकात्याच्या प्रतिष्ठित दक्षिण कलकत्ता लॉ कॉलेजमधून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. २५ जूनच्या रात्री कॉलेज कॅम्पसमध्ये एका विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार झाला करण्यात आला आहे.
पिडीतेने पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीमध्ये म्हटले आहे, “आरोपींनी मला त्यांच्याशी लैंगिक संबंध ठेवण्यास भाग पाडण्यासाठी प्रयत्न केला. मी नकार त्यांना काहीही करू दिले नाही आणि त्यांना मागे ढकलले. मी त्यांना सांगितले मी रिलेशनशिपमध्ये आहे आणि माझ्या प्रियकरावर खूप प्रेम करते. मला जाऊ द्या. ते माझे म्हणणे ऐकत नव्हते आणि त्या भीतीमुळे मला पॅनिक अटॅक आला. मी त्यांना मला रूग्णालयात नेण्यास सांगितले. मात्र ते माझी मदत करत नव्हते.’
पुढे आपल्या जबावात सांगताना पीडिता म्हणाली,’ त्यांनी कॉलेजचे मुख्य द्वार बंद केले. सुरक्षारक्षक असहाय्य होता, त्याने माझी मदत केली नाही. त्यांनी मला जबरदस्ती गार्ड केबिनमध्ये नेले. त्यांनी माझे कपडे काढले आणि माझ्यावर बलात्कार केला. मला त्यांनी ब्लॅकमेल केले. माझ्या मित्राला मारण्याची धमकी दिली आणि पालकांना अटक करतील अशी धमकी दिली.’
‘आरोपी माझ्यावर बलात्कार करत असताना त्यांनी याचे व्हिडिओ शूटिंग केले. मी त्यांना सहकारी न केल्यास हा व्हिडिओ सर्वांना दाखवू अशी धमकी त्यांनी मला दिली. मी खोलीतून बाहेर जाण्याचा प्रयत्न करत होते तेव्हा त्यांनी मला हॉकी स्टिकने मरण करण्यास सुरुवात केली,’ असे पीडितेने आपल्या तक्रारीत म्हटले आहे.
आरोपीने पीडित मुलीकडे लग्नाचा प्रस्ताव ठेवला होता, मात्र तिने तो नाकारला. या रागातून त्याने दोघा साथीदारांच्या मदतीने तिच्यावर बलात्कार केला. पीडितेने विरोध केला, परंतु ती या झटापटीत जखमी झाली. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेची माहिती मिळताच पीडितेची प्राथमिक वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे आणि तिचा जबाबही नोंदवण्यात आला आहे. पोलिसांनी या प्रकरणाशी संबंधित साक्षीदारांचे जबाबही नोंदवले आहेत. ज्या कॉलेजमध्ये ही घटना घडली तो भाग सील करण्यात आला आहे. तेथील फॉरेन्सिक टीमकडून तपासाची तयारी सुरू आहे.