Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारतातील अशी काही ठिकाणे जिथे चुंबकासारख्या खेचल्या जातात गोष्टी, गाड्या स्वतःच वर चढू लागतात

Magnetic Places in India: भारतात अशी काही ठिकाणे आहेत जिथे वाहने चुंबकीय प्रभावामुळे आपोआप वर खेचली जातात. या ठिकाणांना मॅग्नेटिक ठिकाणे म्हटले तरी काही हरकत नाही, फिरण्याची आवड असल्यास या ठिकाणांना एकदा नक्की भेट द्या.

  • By नुपूर भगत
Updated On: Jan 08, 2025 | 09:47 AM
भारतातील अशी काही ठिकाणे जिथे चुंबकासारख्या खेचल्या जातात गोष्टी, गाड्या स्वतःच वर चढू लागतात

भारतातील अशी काही ठिकाणे जिथे चुंबकासारख्या खेचल्या जातात गोष्टी, गाड्या स्वतःच वर चढू लागतात

Follow Us
Close
Follow Us:

जर तुम्हाला विज्ञानाची खूप आवड असेल आणि तुम्ही सतत विज्ञानाशी संबंधित व्हिडिओ किंवा कथा पाहत असाल किंवा वाचत असाल तर आज आम्ही तुमच्यासाठी भारतातील अशी काही ठिकाणे घेऊन आलो आहोत ज्याबद्दल तुम्ही कदाचित ऐकले नसेल. होय, आम्ही अशाच एका चुंबकीय जागेबद्दल बोलत आहोत, ज्याला जर तुम्ही चमत्कारिक ठिकाण म्हटले तर ते चुकीचे ठरणार नाही. सोप्या भाषेत सांगायचे तर, पृथ्वीच्या भूचुंबकीय उर्जेमध्ये चुंबकीय चार्ज केलेले कण आकर्षित करण्याची क्षमता आहे. तुम्हाला फिरण्याची आणि नवनवीन गोष्टी जाणून घेण्याची/पाहण्याची आवड असेल तर तुम्ही एकदा तरी या ठिकाणांना नक्की भेट दिले पाहिजे.

लडाखमधील मॅग्नेटिक हिल

लडाखमधील लेह-कारगिल-बटालिक महामार्गावर स्थित फेमस मॅग्नेटिक हिल हे भारतातील अद्वितीय ठिकाणांपैकी एक आहे. येथील चुंबकीय आकर्षण इतके मजबूत आहे की जड वाहने कोणत्याही प्रतिकाराशिवाय वर खेचली जातात. इतकंच नाही तर इथे कोणताही द्रव ओतला की तो खाली न जाता वरच्या दिशेने जाऊ लागतो. म्हणजे गंमतीत बोललो तर, इथे वाहनांमध्ये तेल भरण्याची गरज भासणार नाही, कारण इथे वाहने आपोआप धावत असतात. याला ऑप्टिकल इल्युजन म्हटले जाते. जो कोणी लडाखला येतो तो लेहजवळील ही मॅग्नेटिक हिल पाहायला नक्कीच जातो. ही टेकडी कोणत्या जादूपेक्षा कमी नाही.

New Year Travel: गोवा-मनाली नाही तर ‘ही’ धार्मिक स्थळ बनली लोकांची पहिली पसंती! अहवालातून धक्कादायक खुलासा

अमरेलीतील तुळशीश्याम रोड

तुळशीश्याम हे एक पौराणिक स्थान मानले जाते, जेथे भगवान श्रीकृष्णाने तुल नावाच्या राक्षसाचा वध केला होता. म्हणून या ठिकाणाला गुजरातमध्ये तुलसीश्याम असे नाव पडले. 3000 वर्ष जुन्या तुळशीश्याम मंदिराव्यतिरिक्त येथील एक रस्ता ग्रॅविटी हिलसाठी प्रसिद्ध आहे. इथेही अनेक पर्यटक आपली वाहने थांबवून लडाखसारखा अनुभव घेतात. त्यामुळे हे ठिकाण भारतात आढळणाऱ्या चुंबकीय पर्वतांपैकी एक आहे.

कालो डूंगर किंवा ब्लॅक हिल

कालो डुंगर किंवा ब्लॅक हिल हे कच्छच्या महान रणमधील एक सुंदर ठिकाण आहे, जिथून सुंदर दृश्य पाहायला मिळते. काही वर्षांपूर्वी डोंगरावर उभी असलेली वाहने भरधाव वेगाने खाली घसरल्याची विचित्र घटना येथे घडली होती. आम्ही तुम्हाला सांगतो, ही वाहने बंद करून सपाट पृष्ठभागावर उभी होती. या प्रकरणाची चौकशी केली असता कालो डुंगरवर ‘ग्रॅव्हिटी हिल’चा प्रभाव असल्याचे आढळून आले. या कारणास्तव, कालो डुंगर हे भारतातील प्रसिद्ध गुरुत्वाकर्षण टेकड्यांपैकी एक आहे.

Neuschwanstein Castle: 19व्या शतकात राजाने बांधला होता हा राजवाडा, 200 हुन अधिक खोल्या अन् अलौकिक सौंदर्याने भरपूर

छत्तीसगडच्या कवर्धा जिल्ह्यात

लडाखच्या चुंबकीय टेकडीसारखा एक पर्वत छत्तीसगडमध्येही पाहायला मिळतो. एका अहवालानुसार, हा भाग कावर्धा जिल्ह्यातील एका टेकडीवर बांधलेल्या रस्त्यावर येतो. चालकविरहित बंद गाड्या येथून वर जातात. म्हणजे ड्रायव्हरलेस गाडी इथे चढताना पाहण्याचा जो आनंद आहे, तो इतरत्र कुठेही मिळत नाही. हा दैवी शक्तीचा प्रभाव असल्याचे येथील दिवाणपाटपार गावातील लोक सांगतात, आदिवासी डोंगराची आणि जंगलाची देवता म्हणून पूजा करतात. दैवी शक्तीच्या प्रभावामुळे मोठमोठ्या लोखंडी गाड्या आपोआप येथील टेकडीवर चढतात, अशी त्यांची धारणा आहे. पण शास्त्रज्ञ म्हणतात की, हा एक ऑप्टिकल भ्रम आहे.

Web Title: Magnetic places in india here you can see geomagnetic energy must visit once

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 08, 2025 | 09:47 AM

Topics:  

  • travel tips

संबंधित बातम्या

भारतीय पर्यटकांसाठी आनंदाची बातमी! आता 30 देशांमध्ये मिळणार व्हिसा फ्री एंट्री! जाणून घ्या संपूर्ण लिस्ट
1

भारतीय पर्यटकांसाठी आनंदाची बातमी! आता 30 देशांमध्ये मिळणार व्हिसा फ्री एंट्री! जाणून घ्या संपूर्ण लिस्ट

Ganeshotsav 2025 : भारताच्या या भागात मोठ्या जल्लोषात साजरा होतो गणेशोत्सव; आताच करा जाण्याची तयारी
2

Ganeshotsav 2025 : भारताच्या या भागात मोठ्या जल्लोषात साजरा होतो गणेशोत्सव; आताच करा जाण्याची तयारी

‘Sea View Room की Parking View…’ ऑनलाइन ट्रॅव्हल पोर्टल्सवर विश्वास ठेवणं कितपत सुरक्षित?
3

‘Sea View Room की Parking View…’ ऑनलाइन ट्रॅव्हल पोर्टल्सवर विश्वास ठेवणं कितपत सुरक्षित?

ओरछा : इतिहास, वास्तुकला आणि अध्यात्माचा अद्भुत संगम; पर्यटनासाठीचे एक परफेक्ट डेस्टिनेशन
4

ओरछा : इतिहास, वास्तुकला आणि अध्यात्माचा अद्भुत संगम; पर्यटनासाठीचे एक परफेक्ट डेस्टिनेशन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.