Mahashivratri 2025: महाशिवरात्रीनिमित्त महाराष्ट्रातील 'या' ज्योतिर्लिंगांना आवर्जून भेट द्या; इथे मिळेल मनःशांती
महाशिवरात्रीचा सण आता अवघ्या काही दिवसांवर आला आहे. यावर्षी 26 फेब्रुवारी 2025 रोजी महाशिवरात्री साजरी केली जाणार आहे. या दिवस पूर्णपणे भगवान शंकरला समर्पित केला जातो. या दिवशी भगवान शिव प्रसन्न होऊन भाविकांना आशीर्वाद देतात अशी मान्यता आहे. म्हणूनच या खास दिवशी लोक उपवास करतात, रुद्राभिषेक करतात आणि शिवमंदिरांना भेट देतात. शिवरात्रीच्या दिवशी विविध शिवमंदिरांना भेट देणे पुण्याचे मानले जाते. या दिवशी सर्व शिवमंदिरात लोकांची प्रचंड गर्दी आणि उत्साह दिसून येतो.
देशभरात 12 ज्योतिर्लिंगे आहेत, जिथे भाविक दर्शनासाठी जाऊ शकतात. ज्योतिर्लिंग हे स्थान आहे जिथे भगवान शिव प्रकाशाच्या रूपात प्रकट झाले होते आणि लिंगाच्या रूपात स्थित आहे. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि गुजरातसह अनेक राज्यांमध्ये ज्योतिर्लिंगे आहेत. यापैकी बहुतांश ज्योतिर्लिंगे ही महाराष्ट्रात आहेत.महाराष्ट्रात 5 पवित्र ज्योतिर्लिंगांची स्थापना आहे. महाशिवरात्रीच्या निमित्ताने महाराष्ट्रातील या 5 पवित्र ज्योतिर्लिंगांना भेट देणे हा एक अद्भुत अनुभव असू शकतो. दरवर्षी लाखो भाविकांची गर्दी येथे जमते आणि शिवभक्त भोलेनाथाची विशेष पूजा करतात. या शिवरात्रीनिमित्त तुम्ही अजूनही जर काही प्लॅन केला नसेल तर तो लगेच कामाला लागा आणि एकतरी ज्योतिर्लिंगाला आवर्जून भेट द्या.
भीमाशंकर
त्र्यंबकेश्वर
घृष्णेश्वर
परळी वैजनाथ
या 5 ठिकाणी होतो दैवी शक्तींचा आभास; गजबजाटापासून दूर इथल्या शांततेत घालवता येतील सुंदर क्षण
औंढा नागनाथ