(फोटो सौजन्य: Pinterest)
आपला भारत देश अनेक सुंदर ठिकाणांना भरलेला आहे. प्रत्येक ठिकाणची स्वतःची अशी वेगळी खासियत असते. भारत देश मुख्यतः इथल्या धार्मिक स्थळांसाठी जगप्रसिद्ध आहे. या ठिकाणांची खासियत म्हणज, या ठिकाणी लोकांना शांताता आणि सुंदर वातावरणाचा अनुभव घेता येतो. अनेकदा येथील इतिहास आणि ऐतिहासिक वास्तू लोकांना मंत्रमुग्ध करून सोडतात.
इतिहास प्रेमींसाठी देशात अनेक ऐतिहासिक वारसा स्थळे आहेत आणि श्रद्धेशी संबंधित अनेक ठिकाणे आणि स्थळेही आहेत. श्रद्धा, परंपरा आणि भक्ती यांनी भरलेली अनेक शहरे येथे आहेत. हे ठिकाण केवळ पर्यटन स्थळ नाही तर दैवी शक्तीचा अनुभव घेण्याचे ठिकाण आहे. तुम्हालाही ही श्रद्धा आणि भक्ती अनुभवायची असेल तर आम्ही या लेखात सांगत असलेल्या या ठिकाणांना एकदा आवर्जून भेट द्या.
स्वर्गापेक्षाही सुंदर या ठिकाणी मिळेल मानसिक शांती, राहण्याचा-जेवणाचा खर्च 1 हजाराहून कमी
वाराणसी
काशी आणि बनारससारख्या नावांनी प्रसिद्ध असलेले वाराणसी अनेक अर्थांनी खास आहे. भगवान शिवाचे हे शहर जगातील सर्वात प्राचीन शहरांपैकी एक मानले जाते. तुम्ही येथे उपस्थित असलेल्या काशी विश्वनाथाचे दर्शन घेऊ शकता, जे 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. इथे तुम्ही गंगा आरतीचा अद्भुत अनुभव घेऊ शकता. हे ठिकाण फक्त आपल्या धार्मिक महत्त्वामुळेच नव्हे तर येथील निसर्गमय सौंदर्यामुळेही देशातील एक लोकप्रिय ठिकाण बनले आहे.
अमृतसर
पंजाबमधील अमृतसर हे शहर अनेक लोकांच्या श्रद्धेचे आणि आस्थाचे केंद्र आहे. येथे असलेल्या सुवर्ण मंदिराला भेट देण्यासाठी लांबून लोक येतात. आकर्षक सुवर्णमंदिर तुम्हाला एक वेगळीच शांतता देते. इथे सर्वजण एकत्र बसून साधे जेवण करतात. हे ठिकाण आठवण करून देते की जेव्हा अध्यात्म आणि विश्वासाचा विचार येतो तेव्हा प्रत्येकजण एकसमान असतो.
ऋषिकेश
देवभूमी उत्तराखंडमधील ऋषिकेश हे अनेक लोकांच्या आवडत्या धार्मिक ठिकाणांपैकी एक आहे. हे शहर तुम्हाला गर्दी आणि गोंगाटापासून दूर शांतता आणि अध्यात्मासोबत वेळ घालवण्याची संधी देते. गंगेचे वाहणारे पवित्र पाणी आणि उंच पर्वत तुम्हाला भक्ती आणि विश्वासाची भावना देतात. या ठिकाणाचे वैशिष्ट्य म्हणजे येथे एकदा आले की या ठिकाणचे सौंदर्य डोळ्यात अशाप्रकारे सजून राहत की ते पुन्हा विसरता येत नाही.
World’s Deepest Hotel: 1300 फूट खाली वसलंय हे अंडरग्राउंड हॉटेल, इथे मिळतो एका वेगळ्याच जगाचा अनुभव
केदारनाथ
केदारनाथला भेट देण्याचे जवळजवळ प्रत्येकाचे स्वप्न असते. हिमालयाच्या उंच शिखरावर असलेले भोलेनाथाचे हे मंदिर जगभरातील अनेक लोकांच्या श्रद्धेचे केंद्र आहे. केदारनाथला धर्तीवरील स्वर्ग अशी उपमा देण्यात आली आहे. केदारनाथचा प्रवास खडतर असला तरी, एकदा का तुम्ही इथे पोहोचलात, शिखरांनी वेढलेले आकाश पाहून तुम्हाला हे जाणवते की चढाई ही कधीच मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी नव्हती, तर ती स्वतःमध्ये शक्ती शोधण्यासाठी होती.
तिरूपति
आजच्या या लिस्टमधील शेवटचे ठिकाण म्हणजे तिरुपती. दरवर्षी हजारो लोक या ठिकाणाला भेट देतात. इथे भेट देणे हे अत्यंत कष्टाचे आणि संयमाचे काम मानले जाते. इथे जाण्यासाठी लांबच लांब रांगा लावून थांबावे लागते. ही अशी जागा आहे जिथे पोहोचल्यावर तुम्हाला एक स्थिर, अढळ विश्वास जाणवेल. जर तुम्हीही तुमच्या जीवनातील रोजच्या धावपळीने त्रस्त असाल, तर तिरुपतीमध्ये तुम्हाला अनुभूती अनुभवायला मिळेल.