monsoon travel tips
नुकताच पावसाळा ऋतू सुरु झाला आहे. या ऋतूत फिरण्याचा आनंदच वेगळा. या मोसमात अनेक ठिकाणचे सौंदर्य आणखीनच सुंदर दिसू लागते. त्यामुळेच या ऋतूत अनेकजण फिरण्याचा प्लॅन करत असतात. मात्र पावसाळ्यात अनेक अपघात घडत असतात, ज्यामुळे प्रवासासाठी योग्य आणि सुरक्षित ठिकाण निवडणे फार गरजेचे आहे. तसेच या ऋतूत भक्कम सुरक्षा व्यवस्था असलेल्या ठिकाणी जावे.वाढते अपघाताचे प्रमाण बघता आज आम्ही तुम्हाला पावसाळ्यात सुरक्षित प्रवास कसा करावा याच्या काही सोप्या टिप्स आज आम्ही तुम्हाला सांगत आहोत.
प्रवास करताना आपला संपूर्ण प्रवास हा सुखकर आणि शांततेत जावा अशी प्रत्येकाची इच्छा असते मात्र आपल्या काही शुल्लक चुकांमुळे अनेक समस्या निर्माण होत असतात. अशावेळी प्रवास करताना प्रवासाचे योग्य नियोजन करणे फार महत्त्वाचे आहे. तसेच प्रवास करताना सुरक्षिततेची देखील काळजी घेणे फार महत्त्वाचे आहे.
प्रवासाचे ठिकाण हुशारीने निवडा
पावसाळ्यात सर्वच ठिकाणे फिरण्यासाठी योग्य नसतात. यावेळी पूर किंवा भूस्खलनाचा धोका असलेले क्षेत्र टाळा. याऐवजी सरासरी पावसाची ठिकाणे निवडा, जेणेकरून तुम्ही निर्सगाच्या आणि त्या ठिकाणच्या सुंदरतेचा पुरेपूर आनंद घेऊ शकता.
सहलीचे नियोजन करा
फिरायला जाताना नेहमी तुमच्या ट्रिपचे हवामानानुसार योग्य नियोजन करा. मुसळधार पाऊस किंवा वादळाचा अंदाज भासल्यास तुमची ट्रिप रद्द करा किंवा पुढे ढकला. खराब वातावरणात फिरायला जाणे धोक्याचे ठरू शकते.
या गोष्टी पॅक करा
पावसाळ्यात कोणत्या ठिकाणी प्रवास करताना ओल्या किंवा निसरड्या हवामानासाठी योग्य असलेले कपडे आणि शूज पॅक करा. तसेच या ऋतूत छत्री, रेनकोट, वॉटरप्रूफ बॅग पॅक करायला विसरू नका.
सुरक्षितता राखा
पावसाळ्यात प्रवास करताना सुरक्षिततेला नेहमी प्राधान्य द्या. मुसळधार पावसात वाहने चालवणे शक्यतो टाळा. तुम्ही जर पूरग्रस्त भागात असाल तर तेथूनच आपली गाडी मागे फिरावा.