pandav made Ancient Shiv Temple know all details and history
भारतात अनेक धार्मिक मंदिर आहेत. यातील प्रत्येक मंदिराची आपली अशी एक वेगळी कथा आहे. यातील अनेक मंदिरं रहस्यमयीदेखील असतात. आज आपण देशातील एका प्रसिद्ध आणि प्राचीन शिवमंदिराविषयी जाणून घेणार आहोत. याचा संबंध रामायण-महाभारताशी जोडला जातो. पौराणिक कथेनुसार, हे मंदिरं पांडवांनी बांधल्याचे सांगितले जाते. सध्याच्या आल्हाददायी वातावरणात जर तुम्ही कुठे फिरायला जाण्याचा विचार करत असाल तर हे मंदिर तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय ठरेल.
हिंदूंच्या श्रद्धेचे केंद्र असलेले हे ठिकाण पर्यटनाच्या दृष्टिकोनातूनही खूप खास आहे. तर आम्ही तुम्हाला ज्या मंदिराविषयी सांगत आहोत ते आहे, हिमालयाच्या दऱ्यांमध्ये वसलेले तुंगनाथ मंदिर. भगवान शिवाला समर्पित असलेले हे मंदिर अतिशय प्राचीन आहे. समुद्रसपाटीपासून सुमारे 3680 मीटर उंचीवर असलेले हे मंदिर उत्तराखंडच्या रुद्रप्रयाग जिल्ह्यात आहे.हे मंदिर पंच केदारांपैकी एक आहे. देवभूमी उत्तराखंडच्या रुद्रप्रयाग जिल्ह्यात असलेले तुंगनाथ मंदिर हे जगातील सर्वात उंच शिव मंदिर आहे. येथून हिमालयाच्या सुंदर दऱ्या आणि शांत वातावरणाचा अनुभव घेता येतो. निसर्गसौंदर्याचे दर्शन घ्यायचे असेल तर तुंगनाथ मंदिर एक चांगला पर्याय आहे.
हेदेखील वाचा – बॉलीवूड अभिनेत्री आदिती रावने सिद्धार्थसोबत 400 वर्ष जुन्या मंदिरात केले लग्न, तुम्हीही येथे घेऊ शकता सात फेरे
तुंगनाथ मंदिर हे पांडवांनी बांधेले होते अशी मान्यता आहे. एका पौराणिक कथेनुसार, महाभारत युद्धातील नरसंहारानंतर 5 पांडव त्यांच्या पापांचे प्रायश्चित्त करण्यासाठी हिमालयाच्या प्रवासाला निघाले आणि यावेळी त्यांनी तुंगनाथ येथे भगवान शंकराची तपश्चर्या केली आणि येथे शिवलिंगाची स्थापना केली. या प्राचीन मंदिराला भेट देण्यासाठी जाण्यासाठी तुम्हाला खडकाळ रस्त्यावरून जावे लागेल. साधारण सप्टेंबर, ऑक्टोबर महिन्यात येथे सुंदर वातावरण असते. अशा परिस्थितीत याकाळात तुम्ही या मंदिराला भेट देण्याचा विचार करू शकता.
तुंगनाथ मंदिर हे महाभारताच्या काळात बांधले गेले असे म्हटले जाते. या पवित्र मंदिराचा पाया पांडवांचा पराक्रमी योद्धा अर्जुन याने घातला होता. असे म्हणतात की, हजारो वर्षांपूर्वी पांडवांनी भगवान शिवाला प्रसन्न करण्यासाठी या मंदिराची उभारणी केली होती. महाभारताच्या भयंकर युद्धात आपले नातलग गमावल्यानंतर पांडव नर हत्येच्या ओझ्याखाली दाबले गेले. ऋषी व्यासांच्या सूचनेनुसार, पांडवांनी त्यांच्या पापांचे प्रायश्चित्त करण्यासाठी भगवान शिवाची पूजा केली आणि या पवित्र स्थानावर एक भव्य मंदिर बांधले. असे मानले जाते की भगवान शिवाच्या कृपेने पांडवांची आपली सर्व पापे धुतली.
हेदेखील वाचा – भारतीय रेल्वेकडून पुण्य कमावण्याची संधी! अयोध्या-वाराणसीसारख्या अनेक धार्मिक स्थळांचे पॅकेज लाँच