ट्रेनमध्ये चढताच प्रवाशांना मिळतात या 5 सुविधा, पुढच्या वेळी प्रवास कराल तर याचा लाभ नक्की घ्या
भारतीय रेल्वे हे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात मोठे रेल्वे नेटवर्क आह. दरररोज हजारो प्रवासी रेल्वेने प्रवास करत असतात. हा वेगवान आणि कमी खर्चिक प्रवासासाठी रेल्वेचा पर्याय सर्वोत्तम आहे. अधिकतर लोक लांबच्या प्रवाशासाठी रेल्वेचा पर्याय निवडतात, तसेच रोज रेल्वेने प्रवास करणारे नोकरदार वर्गही रेल्वे प्रवासाचा लाभ घेतात.
मात्र अजूनही अनेकांना रेल्वे प्रवासात मिळणाऱ्या सुविधांविषयी फारशी माहिती नाही. आम्ही तुम्हाला सांगतो की,तुम्ही जर भारतीय रेल्वेने प्रवास करत असाल तर तुम्हाला काही सुविधा पुरवल्या जातात ज्यांचा तुम्ही पुरेपूर लाभ उचलू शकता. जर तुम्ही ट्रेनने प्रवास करण्याचा विचार करत असाल तर या सुविधांविषयी तुम्हाला माहिती असलीची पाहिजे. चला तर मग या रेल्वे प्रवासावेळी प्रवाशांना कोणकोणत्या सुविधा दिल्या जातात ते सविस्तर जाणून घेऊया.
शिमला-मनाली विसरा, फक्त 2000 रुपयांत करा हिमाचल प्रदेशच्या या 5 ठिकाणांची सैर
ब्लँकेट उशीची सुविधा
भारतीय रेल्वे आपल्या सर्व गाड्यांच्या एसी डब्यांमध्ये मोफत बेडरोल्सची सुविधा उपलब्ध करून देते, ज्यामध्ये प्रवाशाला एक ब्लँकेट, एक उशी, दोन बेडशीट आणि फेस टॉवेल दिला जातो. जर तुम्ही 1AC, 2AC आणि 3AC कोचमध्ये प्रवास करत असाल तर तुम्हाला या सर्व गोष्टी दिल्या जातील. तथापि गरीब रथ एक्स्प्रेसमध्ये तुम्हाला एका बेडरोलसाठी 25 रुपये मोजावे लागतील. याशिवाय, काही ट्रेनमध्ये, तुम्ही तिकीट बुकिंगच्या वेळी तुमच्या गरजेनुसार स्लीपर क्लासमध्ये बेडरोल देखील घेऊ शकता. जर तुम्हाला ट्रेन प्रवासादरम्यान फ्री बेडरोल मिळत नसेल तर ते त्याविरोधात तक्रार करू शकतात आणि त्यावेळी तुम्हाला 20 रुपयांचा रिफंड मिळेल.
मेडिकल हेल्प
ट्रेनमध्ये प्रवास करताना तुम्ही तुम्हाला काही दुखापत झाल्यास किंवा आजरी पडल्यास, तुम्ही फ्रंट लाइन स्टाफ, TTE, ट्रेन सुपरिटेंडंट इत्यादींकडून मेडिकल हेल्प मागू शकता. हे लोक तुम्हाला प्रथमोपचारात मदत करतील आणि गरज पडल्यास वैद्यकीय मदत करतील. याशिवाय, भारतीय रेल्वे तुम्हाला ट्रेनच्या थांब्यावर माफक शुल्कात वैमेडिकल हेल्पची सुविधा देखील पुरवते. मात्र, प्रवाशाची तब्येत अधिक बिघडल्यास त्याला रुग्णालयात दाखल करून त्याचा प्रवास थांबवावा लागतो.
फ्री जेवण
जर तुम्ही राजधानी, दुरांतो आणि शताब्दी सारख्या प्रीमियम ट्रेनमध्ये प्रवास करत असाल आणि ट्रेनला निर्धारित स्थानकापासून 2 तासांपेक्षा जास्त उशीर होत असेल तर तुम्हाला भारतीय रेल्वेकडून मोफत जेवणाची सुविधा पुरवली जाते.
महिनाभर स्टेशनवर ठेवू शकता सामान
फार कमी लोकांना हे ठाऊक आहे पण रेल्वे स्टेशनवर प्रवाशांसाठी क्लोक रूम आणि लॉकर रूमची प्रमुख सुविधा उपलब्ध असते. या लॉकर रूम आणि क्लोक रूममध्ये प्रवासी त्यांचे सामान 1 महिन्यासाठी ठेवू शकतात. मात्र, यासाठी तुम्हाला निश्चित शुल्क भरावे लागेल.
व्यवस्थापनाविरुद्ध तक्रार करता येते
तुम्हाला रेल्वेने प्रवास करताना काही समस्या तर तुम्ही मदतीसाठी अथक तक्रारीसाठी 139 या क्रमांकावर कॉल करू शकता. याशिवाय स्टेशन किंवा ट्रेनमध्ये अस्वच्छ स्नानगृह, खराब अन्न, चोरी, दरोडा किंवा कोणत्याही प्रकारची समस्या असल्यास तुम्ही www.pgportal.gov.in या ऑनलाइन पोर्टलवर जाऊन तक्रार करू शकता. याशिवाय तुम्ही हेल्पलाइन नंबर 9717630982 किंवा टेलिफोन नंबर 011-23386203 वर कॉल करू शकता.