सर्वात थरारक रास्ता! 30000 किमीचा तो महामार्ग जो 14 देशांना ओलांडतो, ना कोणता जोडरस्ता ना कोणते वळण...
कोणत्याही ठिकाणी पोहचायचे असेल तर त्यासाठी प्रवास हा करावाच लागतो. आपण कोणत्या ठिकाणी जात आहोत त्यावर आपला प्रवास कसा आणि किती मोठा असेल हे अवलंबून राहतो. अनेकदा हा प्रवास सुंदर दृश्यांतून पार पडतो ज्यामुळे आपला प्रवास आणखीनच सुखकर आणि आरामदायी बनतो. तसेच काहीदा हा प्रवास बराच थकवणारा आणि नकोनकोसा होतो, आपल्या ठिकाणापर्यंत जाईस्तोवर आपल्याला हा प्रवास हैराण करून सोडतो. आज आम्ही तुम्हाला या लेखात जगातील अशा एका रस्त्याविषयी सांगणार आहोत जिथला प्रवास तुम्हाला हैराण करून सोडेल. इथे वेळ तर सरत जाईल पण तुमचा प्रवास काही संपणार नाही. हा जगातील सर्वात लांबीचा मागमार्ग म्हणून ओळखला जातो जो कोणत्या आश्चर्याहून कमी नाही.
आम्ही ज्या रस्त्याविषयी बोलत आहोत तो रास्ता म्हणजे पॅन अमेरिकन हायवे (Pan-American Highway). या रस्त्याची नोंद जगातील सर्वाधिक लांबीच्या महामार्गांमध्ये करण्यात आली आहे. याच्या सर्वाधिक लांबीमुळे या रस्त्याची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्येही करण्यात आली आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, हा रास्ता उत्तर अमेरिकेतून सुरू होतो, जो चक्क एक नाही दोन नाही तर तब्बल 14 देशांना ओलांडून दक्षिण अमेरिकेतील अर्जेंटीनापर्यंत पोहोचतो. या रस्त्याच्या आजूबाजूला ना तुम्हाला कोणती हिरवळ दिसेल ना सुंदर दृश्ये इथे दिसेल ते फक्त घनदाट वनक्षेत्र, वाळवंटीय प्रदेश, बर्फाळ प्रदेश आणि पर्वतीय प्रदेश.
उत्तर, मध्य आणि दक्षिण अमेरिकेतील राज्यांना जोडण्याच्या उद्देशाने या रस्त्याला तयार करण्यात आलं होत. 1923 मध्ये याची बांधणी करण्यात आली. हा रास्ता पॅन अमेरिकन हायवे मेक्सिको, ग्वाटेमाला, एल साल्वाडोर, होंडुरस, निकारागुआ, कोस्टा रिका उत्तर अमेरिकेतील पनामा, कोलंबिया, इक्वेडोर, पेरू, चिली आणि अर्जेंटीनाहून दक्षिण अमेरिकेपर्यंत पोहोचतो. 30 हजार किमीपर्यंत पसरलेल्या या महामार्गावर गाडी चालवणं काही सोपी गोष्ट नाही. इथले वातावरण अनेकदा तुम्हाला तुम्ही कोणत्या तरी विळख्यात अडकल्याचा किंवा तुम्हाला चकवा लागल्याचा भास करून देईल.
आम्ही तुम्हाला सांगतो की, जगातील सर्वात लांबीच्या या महामार्गावर एकही वळण किंवा जोडरस्ता नाही. एका सरळ रस्त्यामार्गे तुम्हाला इथून प्रवास करावा लागतो. हा प्रवास काही दिवसांचा किंवा तासांचा नसून अनेक महिनोंमहिने सुरु राहील. हे अंतर ओलांडण्यासाठी जवळपास 60 दिवस अर्थात दोन महिन्यांचा कालावधी लागतो. रोड ट्रिपची आवड असणाऱ्यांसाठी हा रास्ता एक उत्तम आणि साहसी पर्याय आहे. फक्त वेगवेगळे देशच काय तर इथे तुम्ही वेगवेगळ्या ऋतूंचाही अनुभव घेऊ शकता. एका व्यक्तीने या महामार्गावरील प्रवास पूर्ण केला होता. त्याचे नाव कालोरस सांतामारिया असून त्याला हा प्रवास पूर्ण करण्यासाठी तब्बल 117 दिवस लागले.