(फोटो सौजन्य: Twitter)
क्रिकेटविश्वातील नामांकित खेळाडू म्हणून सचिन तेंडुलकर आणि विराट कोहलीची ओळख आहे. दोन्ही खेळाडूंनी टीम इंडियाला एक वेगळी ओळख मिळवून दिली. आजही त्यांचे नाव काढतच त्यांचे चाहते त्यांच्यासाठी वेडे होतात. अनेकदा या दोन खेळाडूंमधील सर्वोत्तम खेळाडू कोण यासाठी चाहत्यांमध्ये बऱ्याचदा तुलना सुरु असते मात्र परंतु आपण सचिनची तुलना कोणाशीही करू शकत नाही, कारण तो त्याच्या काळातील सर्वोत्तम ठरला आहे आणि त्याला क्रिकेटच्या देवाचा दर्जा मिळाला आहे.
विराटबद्दल बोलणे केले तर, कोहलीला किंग कोहली म्हणून ओळखले जाते. भारतीय क्रिकेटच्या या दोन चेहऱ्यांचे जगाला वेड लागले असले तरी तोही सचिनच्या पावलावर पाऊल टाकत आहे. पण तुम्हाला माहिती आहे का, या दोघांच्या नावावर रेल्वे स्टेशन आहे, पण दोघेही तिकडे कधीही गेले नाहीत. तुम्हालाही प्रश्न पडला असेल, हे नक्की कोणते स्टेशन्स आहेत. चला तर याविषयी सविस्तर जाणून घेऊया.
सचिन तेंडुलकरची गणना जगातील महान फलंदाजांमध्ये केली जाते. त्यांचा जन्म 24 एप्रिल 1973 रोजी मुंबई (महाराष्ट्र) येथे झाला. क्रिकेटच्या देवाच्या नावावर अनेक मोठे विक्रमही नोंदवले गेले आहेत. त्याच्या रेकॉर्डबद्दल लोकांना बरीच माहिती आहे, परंतु देशात ‘सचिन’ नावाचे एक रेल्वे स्टेशन आहे हे फार कमी लोकांना माहिती आहे. फक्त सचिनच नाही तर विराटच्याही नावावर रेल्वे स्टेशन आहे, पण ते दोघे आजपर्यंत इथे आलेले नाहीत. त्यामागचे कारण म्हणजे ही रेल्वे स्थानके विराट आणि सचिन या दोघांच्याही नावाने त्यांच्या जन्मापूर्वीच बांधली गेली होती. म्हणजेच सचिन तेंडुलकर आणि विराटच्या लोकप्रियतेमुळे या रेल्वे स्थानकांना त्यांचे नाव नाही देण्यात आले.
सचिन तेंडुलकरच्या नावावर असलेले रेल्वे स्टेशन गुजरात राज्यातील सुरत शहराजवळ आहे. हे स्थानक मुंबई-अहमदाबाद-जयपूर-दिल्ली मार्गावर आहे. स्टेशनचे फोटो भारतीय संघाचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी 2003 साली सोशल मीडियावर शेअर केले होते आणि त्यांनी इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत त्यांनी यात लिहिले होते की, सुरतजवळील एका स्टेशनचे नाव या खेळातील महान खेळाडूंपैकी एक आणि माझ्या आवडत्या क्रिकेटर आणि माझ्या आवडत्या व्यक्तीच्या नावावर आहे. हे नाव ठेवण्यामागे काय विचार होता? सचिन तेंडुलकरच्या नावावर असलेली रेल्वे राजधानी दिल्ली रेल्वे स्थानकापासून सुमारे 13-15 तासांच्या अंतरावर आहे.
भारतीय संघाचा स्टार फलंदाज विराट याच्या नावावर असलेले रेल्वे स्थानक हे नागपूर CR रेल्वे विभागातील भोपाळ-नागपूर विभागातील एक रेल्वे स्थानक आहे. हे महाराष्ट्रातील नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर येथील येलकापर येथे राज्य महामार्ग 250 च्या इंटरचेंजवर हे स्थानक वसलेले आहे. तर कोहली रेल्वे स्टेशनचे अंतर अंदाजे 19-20 तासांचे आहे.
दाव्यामागे काय आहे सत्य
आम्ही तुम्हाला सांगतो की, सोशल मीडियावरील व्हायरल पोस्टमध्ये ज्या रेल्वे स्थानकांना विराट आणि सचिनची नावे ठेवल्याचा दावा केला जात आहे तो दावा जरी खरा असला तरी ही स्थानके कोहली आणि सचिनच्या जन्मापूर्वीच बांधण्यात आली होती.