Makar Sankranti 2025: मकर संक्रांतीच्या शॉपिंगसाठी बेस्ट आहेत दिल्लीचे हे बाजार, जाणून घ्या
संपूर्ण देशात उद्या 14 जानेवारी रोजी मकर संक्रातीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. या दिवशी सर्वजण एकमेकांना तिळगूळ देऊन मकर संक्रातीच्या शुभेच्छा देतात. शिवाय आकाशात पतंग देखील उडवली जातो. दिल्लीत मकर संक्रांतीच्या खरेदीसाठी अनेक उत्तम बाजारपेठा आहेत. या मार्केटमध्ये तुम्हाला तिळाचे लाडू, तिळगूळ, पतंग आणि इतर सणाच्या वस्तू सहज मिळतील. या मार्केटमध्ये तुम्ही बजेट-फ्रेंडली खरेदीचा आनंद घेऊ शकता. चला तर मग या बाजारपेठांबद्दल जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – pinterest)
Vatican library: या ठिकाणी आहेत तब्बल 10 लाख पुस्तके, पण प्रवेश मिळणं कठीण! काय आहे कारण
चांदनी चौक हे दिल्लीतील सर्वात जुने आणि प्रसिद्ध मार्केट आहे. दिल्लीचा चांदनी चौक हा भारतातील सर्वात जुना बाजार तर आहेच, पण या ठिकाणचे सौंदर्य कधीही कमी होत नाही. येथे तुम्हाला सणाच्या वस्तूंसह इतर सर्व प्रकारच्या वस्तू मिळतील. मकर संक्रांतीनिमित्त चांदणी चौक पतंगांनी सजवला जातो. येथे तुम्हाला वेगवेगळ्या आकाराचे आणि रंगांचे पतंग मिळतील. याशिवाय तुम्ही तिळाचे लाडू, तिळगूळ आणि इतर मिठाई देखील येथे खरेदी करू शकता. ज्यामुळे तुमची मकर संक्राती अविस्मरणीय होईल. चांदणी चौकातील अनेक दुकाने रात्री उशिरापर्यंत सुरु राहतात, त्यामुळे रात्रीही येथे फिरून खरेदीचा आनंद लुटता येतो.
लाजपत नगर हे दिल्लीचे आणखी एक लोकप्रिय मार्केट आहे. येथे तुम्हाला कपडे, शूज आणि इतर वस्तूंची खरेदी करता येईल. मकर संक्रांतीनिमित्त लाजपत नगरमध्ये हिवाळ्यातील कपड्यांची मुबलकता आहे. येथे तुम्ही थंडीच्या दिवसांत परिधान करण्यासाठी स्वेटर, जॅकेट आणि इतर कपडे खरेदी करू शकता. येथे तुम्हाला अनेक प्रकारच्या डिझाईन्स आणि फॅब्रिक्सचे कपडे मिळतील. लाजपत नगरमध्येही काही दुकाने रात्री उशिरापर्यंत सुरू असतात.
सदर बाजार हे दिल्लीतील व्होलसेल मार्केट आहे. येथे तुम्हाला विविध प्रकारच्या वस्तू व्होलसेल दरात मिळतील. मकर संक्रांतीनिमित्त सदर बाजारात तिळाचे लाडू, गूळ व इतर मिठाईची व्होलसेल विक्री होते. जर तुम्हाला सणासुदीच्या वस्तू मोठ्या प्रमाणात खरेदी करायच्या असतील तर सदर बाजार हे तुमच्यासाठी उत्तम ठिकाण आहे. येथे तुम्ही तुमच्या संपूर्ण सोसायटीसाठी खरेदी करू शकता.
खारी बारी हा दिल्लीचा प्रसिद्ध मिठाई बाजार आहे. येथे तुम्हाला तिळाचे लाडू, तिळगूळ आणि इतर विविध प्रकारच्या मिठाई मिळतील. तुम्हाला मकर संक्रांतीसाठी स्वादिष्ट मिठाई खरेदी करायची असल्यास, तुमच्यासाठी खारी बारी हे सर्वोत्तम ठिकाण आहे. या मिठाईची चव तुम्हाला नेहमी लक्षात राहिल, यात काही शंकाच नाही.
सरोजिनी नगर हे दिल्लीतील कपड्यांची मोठी बाजारपेठ आहे. येथे तुम्हाला विविध प्रकारचे कपडे अतिशय कमी किमतीत मिळतील. मकर संक्रांतीनिमित्त सरोजिनी नगर लहान मुलांच्या कपड्यांनी भरलेले आहे. तुम्हाला तुमच्या मुलांसाठी नवीन कपडे खरेदी करायचे असतील, तर सरोजिनी नगर हे तुमच्यासाठी उत्तम ठिकाण आहे.