Vatican library: या ठिकाणी आहेत तब्बल 10 लाख पुस्तके, पण प्रवेश मिळणं कठीण! काय आहे कारण
जगात लाखो लायब्ररी आहेत. आपल्या कॉलेज आणि शाळेत देखील लायब्ररी असते, ज्यामध्ये शेकडो पुस्तकं असतात. पण जगात अशा अनेक लायब्ररी आहेत, ज्या शेकडो वर्षे जुन्या आहेत आणि त्यांचा इतिहास देखील अगदी मनोरंजक आहे. आज आम्ही तुम्हाला अशाच एका लायब्ररीबद्दल सांगणार आहोत. या लायब्ररीचं नाव आहे वेटिकन लायब्ररी. वेटिकन लायब्ररी ही जगातील सर्वात जुन्या लायब्ररींपैकी एक आहे. या लायब्ररीचा इतिहास अतिशय मजेदार आहे.
खरं तर या लायब्ररीमध्ये लाखो पुस्तकं आहेत, जी वेगवेगळ्या विषयांशी संबंधित आहेत. त्यामुळे या लायब्ररीला भेट देण्यासाठी लाखो पर्यटक जातात. मात्र या लायब्ररीमध्ये प्रवेश मिळण कठिण आहे. या लाखो पुस्तकांच्या जगात सामान्य पर्यटक जाऊ शकत नाहीत. याचं कारण काय आहे आणि या जगातील सर्वात जुन्या लायब्ररींपैकी एक असलेल्या वेटिकन लायब्ररीचा इतिहास काय आहे, याबद्दल जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – pinterest)
वेटिकन लायब्ररी रोम शहरातील कॅथलिक चर्चमध्ये स्थित आहे. ही जगातील सर्वात जुन्या लायब्ररींपैकी एक आहे. असं सांगितलं जात की, 1475 मध्ये अधिकृतपणे वेटिकन लायब्ररीची स्थापना करण्यात आली. या वेटिकन लायब्ररीचा इतिहास शेकडो वर्षे जुना आहे. गेल्या 600 वर्षांमध्ये या वेटिकन लायब्ररीमध्ये अनेक गोष्टींचा संग्रह करण्यात आला आहे. पूर्वीच्या काळात वेटिकन लायब्ररीला वेटिकन सीक्रेट आर्काइव या नावाने देखील ओळखलं जात होतं.
वेटिकन लायब्ररी ही एक अद्भुत आणि ऐतिहासिक जागा आहे, जी वेटिकन सिटीमध्ये स्थित आहे. वेटिकन लायब्ररी जगातील सर्वात जुन्या आणि सर्वात मोठ्या लायब्ररींपैकी एक आहे. या लायब्ररीमध्ये 10 लाखांहून अधिक पुस्तकं आणि इतर लायब्ररी साहित्यांचा संग्रह आहे. वेटिकन लायब्ररी केवळ एक महत्त्वाचे पुस्तक संग्रहालय नाही, तर एक महत्त्वपूर्ण शोध केंद्र देखील आहे. जगभरातून विद्वान आणि संशोधक वेटिकन लायब्ररीमध्ये येतात आणि या ठिकाणी असणाऱ्या साहित्य संग्रहाचा अभ्यास करतात.
वेटिकन लायब्ररीचा इतिहास 15 व्या शतकात सुरु होतो. पोप निकोलस पंचमने याची स्थापना केली होती. त्यावेळी लायब्ररीमध्ये केवळ 2,000 पुस्तके होती. मात्र काळानुसार वेटिकन लायब्ररीच्या संग्राहात भर पडत गेली आणि आज ही जगातील सर्वात जुन्या आणि सर्वात मोठ्या लायब्ररींपैकी एक आहे.
ही जगातील अशी एकमेव लायब्ररी आहे, जिथे सर्वांना आत जाण्याची परवानगी देण्यात आली नाही. विशेष परवानगी असलेले लोकचं वेटिकन लायब्ररीमध्ये प्रवेश करू शकतात. विद्वान, रिसर्चर, यूनिवर्सिटी प्रोफेसर यांसारखे लोक वेटिकन लायब्ररीमध्ये प्रवेश करू शकतात. मात्र यासाठी त्यांना विशेष परवानगी घ्यावी लागते. परवानगीशिवाय वेटिकन लायब्ररीमध्ये कोणीही प्रवेश करू शकत नाही.
हे आहेत जगातील सर्वात जुने बाजार! माशांपासून कपड्यांपर्यंत येथे सर्व काही मिळणार
असं सांगितलं जातं की, वेटिकन लायब्ररीमध्ये फार जुन्या साहित्यांचा संग्रह आहे. त्यामुळे या ठिकाणी सामान्य लोकांना प्रवेश करण्याची परवानगी नाही. वेटिकन लायब्ररीमध्ये सिक्रेट लिटरेचर आहे, असं देखील सांगितलं जात.