Year Ender 2024: फॅमिली वेकेशनसाठी भारतातील या 10 ठिकाणांना मिळाली पहिली पसंती, तुम्ही भेट दिली का?
2024 मध्ये भारतीयांना अनेक नवीन ठिकाणे एक्सप्लोअर केली. यातील काही ठिकाणं देशातील होती तर काही ठिकाणं देशाबाहेरची होती. यातील प्रत्येक ठिकाणी एक नवीन साहस आणि एक नवीन अनुभव घेण्याची संधी मिळाली. 2024 मध्ये भारतीयांनी ज्या पद्धतीने परदेशातील ठिकाणांना पसंती दर्शवली त्याप्रमाणे त्यांनी आपल्या देशातील ठिकाणांना देखील पसंती दर्शवली आहे.
शांत आणि निसर्गाच्या सानिध्यात भारतीयांनी त्यांच्या कुटूंबियांसोबत वेळ घालवला. या सर्व आठवणी अविस्मरणीय आहेत. भारतीयांना भेट दिलेल्या या ठिकाणांमध्ये आपल्या देशातील समुद्रकिनारे, पर्वत, ऐतिहासिक स्थळे आणि वन्यजीव सफारी यांचा समावेश होता. ही सर्व ठिकाणी फॅमिली वेकेशनसाठी सर्वोत्तम आहेत. आज आम्ही तुम्हाला अशा काही ठिकाणांबद्दल सांगणार आहोत, जी 2024 मध्ये भारतीयांची पहिली पसंती राहिली आहे. विशेषत: ज्या लोकांना त्यांच्या कुटूंबासोबत काही वेळ घालवयाचा होता, अशा लोकांनी या ठिकाणांना सर्वाधिक भेट दिली आहे. (फोटो सौजन्य – pinterest)
शांत आणि सुंदर समुद्रकिनारी आपल्या कुटूंबासोबत आनंदाचे क्षण घालवण्यासाठी गोवा भारतीयांची पहिली पसंती ठरली आहे. येथे तुम्ही तुमच्या मित्रांसोबत, तसेच कुटूंबासोबत देखील येऊ शकता. या ठिकाणी असलेले चर्च आणि रंगीबेरंगी संस्कृती तुम्हाला एक वेगळा अनुभव देईल.
केरळमधील चहाचे मळे हे प्रत्येकासाठीच एक आकर्षण आहे. केरळमध्ये गेल्यानंतर चहाच्या मळ्यांना भेट दिली नाही, असं होणं अशक्य आहे. शिवाय या ठिकाणी असलेले नैसर्गिक सौंदर्य आणि स्वादिष्ट खाद्यपदार्थ म्हणजे पर्यटकांसाठी सोने पे सुहागा.
उन्हाळ्याच्या काळात काश्मीरला सर्वाधिक भेट देण्यात आली. या ठिकाणी असलेल्या दऱ्या – खोऱ्यांच्या सानिध्यात स्कीइंग, स्नोबोर्डिंग आणि केबल कार राइड्सची मजा घेण्याचा आनंदच वेगळा आहे.
उत्तराखंडमध्ये वसलेले मसुरी हिल स्टेशन फेमस ट्युरिस्ट डेस्टिनेशन आहे. येथे तुम्ही केबल का राइड्ससोबतच शॉपिंगचा आनंद देखील घेऊ शकता.
तुम्हाला तुमच्या कुटूंबियांसोबत क्वालिटी टाइम घालवायचा असेल तर सिक्कीम शिवाय दुसरी कोणतीही जागा नाही.
मनाली हे हिमाचल प्रदेशात वसलेले एक लोकप्रिय हिल स्टेशन आहे.
तुम्ही तुमच्या फॅमिलीसोबत पश्चिम बंगालला जात असाल तर तुम्ही दार्जिलिंगला नक्की भेट द्या.
गुलमर्ग हे काश्मीरमधील सुंदर हिल स्टेशन आहे. येथे तुम्ही स्कीइंग आणि स्नोबोर्डिंगचा आनंद घेऊ शकता.
राजस्थानच्या वाळवंटामध्ये वसलेले जैसलमेर फॅमिली वेकेशनसाठी सर्वोत्तम आहे.
देशाची राजधानी असलेलं दिल्ली शहर देखील 2024 मध्ये भारतीयांची पहिली पसंती ठरलं आहे.