भातातील एक असे मंदिर जिथे दरवाजातून नाही तर खिडकीतून मिळते दर्शन, प्रसादही हातात दिला जात नाही; अनोखी आहे कथा
देशात अनेक धार्मिक मंदिर आहेत जिथे लोक दूरदूरवरून येतात. प्रत्येक मंदिराची आपली अशी वेगळी खासियत आणि अनोखा इतिहास असतो. आज आज आम्ही तुम्हाला देशातील अशाच एका खास मंदिराविषयी माहिती सांगत आहोत, जिथे अनेक अशा गोष्टींचे पालन केले जाते ज्या तुम्ही कधीही कोणत्या मंदिरात अनुभवल्या नसतील.
मथुराप्रमाणेच उडुपी हे भगवान कृष्णाच्या भक्तांसाठी पवित्र स्थान मानले जाते. उडुपीचे कृष्ण मंदिर हे कृष्ण भक्तांचे श्रद्धेचे केंद्र आहे, दररोज हजारो भाविक कृष्णाचे दर्शन आणि पूजा करण्यासाठी येथे पोहोचतात. मंदिरातील भगवान श्रीकृष्णाची सर्वात सुंदर मूर्ती तीच मानली जाते ज्यामध्ये ते बालकृष्णाच्या रूपात विराजमान आहेत. मंदिरातील मूर्तीचे प्रत्यक्ष दर्शन कोणालाही करता येत नाही. येथे नऊ छिद्रे असलेल्या छोट्या खिडकीतून भगवान श्रीकृष्णाचे दर्शन करता येते. हे अनोखे मंदिर आपल्या वेगळेपणासाठी खास करून ओळखले जाते.
बंद होण्यापूर्वी एकदा तरी द्या सूरजकुंड मेळ्याला भेट, तिकिटांवर मिळत आहे 40 टक्क्यांची सूट
देवानेच तयार केली होती खिडकी
असे मानले जाते की देवाने आपल्या एका भक्ताच्या भक्तीवर प्रसन्न होऊन प्रत्येकाला त्याचे दर्शन घेता यावे म्हणून ही खिडकी बांधली होती. हे मंदिर श्री मध्वाचार्यांनी13व्या शतकात स्थापन केले होते आणि तेव्हापासून ते दक्षिण भारतातील सर्वात प्रसिद्ध आणि पवित्र मंदिरांपैकी एक मानले जाते. जन्माष्टमीनिमित्त या बाजाराची सजावट पाहण्यासारखी असते. मंदिर फुलांनी आणि रंगीबेरंगी दिव्यांनी सजवले जाते. इथे दर्शन घेणे काही सोपी गोष्ट नाही दर्शनासाठी भक्तांना इथे तासनतास थांबावे लागते.
मंदिराबाबतची मान्यता
मंदिराशी निगडीत आणखी एक मान्यता अशी आहे की, एकदा श्री मध्वाचार्यांनी समुद्रात वादळात अडकलेल्या एका जहाजाला आपल्या दैवी शक्तीने वाचवले होते. जहाज किनाऱ्यावर पोहोचले तेव्हा त्यात श्रीकृष्णाची मूर्ती सापडली, जी समुद्राच्या चिखलाने मढलेली होती. माधवाचार्यांनी ती मूर्ती उडुपीला आणून मंदिरात स्थापित केली, आजही भक्त तिची भक्तिभावाने पूजा करतात.
Udaipur: स्वस्तात द्या City Of Lakes ला भेट; IRCTC चे नवीन पॅकेज लाँच; किंमत 7000 हुन कमी
हातात दिला जात नाही प्रसाद
मागेच या मंदिरासंबंधीचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता ज्यात एक महिला जमिनीवर बसून प्रसाद खात आहे. यावर इन्फ्लुएंसेरने सांगितले की लोक त्यांच्या इच्छा पूर्ण झाल्यावर असे करतात. होय, मंदिरात, मंदिराच्या फरशीवर भक्तांना प्रसाद दिला जातो. असे मानले जाते की भक्त स्वतः फरशीवर प्रसाद देण्याची मागणी करतात. याचे कारण त्यांच्या मनोकामना पूर्ण होतात. वास्तविक ज्या भाविकांची इच्छा पूर्ण होते ते मंदिराच्या फरशीवर प्रसाद ग्रहण करतात.
मंदिराची वेळ
मंदिर पहाटे साडेचार वाजता उघडले जाते, परंतु ही वेळ फक्त मठातील लोकांसाठी आहे, सामान्य भाविकांसाठी मंदिर पहाटे 5 वाजता उघडले जाते. मंदिर दररोज रात्री 10 वाजता बंद होते, जेव्हा सर्व पूजा आणि आरत्या पूर्ण होतात. उत्सवाच्या काळात मंदिर उघडण्याच्या आणि बंद होण्याच्या वेळेत बदल घडू शकतो.
इथे कसे पोहचणार?
मंदिरापासून 59.1 किमी अंतरावर मंगळुरू आंतरराष्ट्रीय विमानतळ हे सर्वात जवळचे विमानतळ आहे. येथून तुम्ही टॅक्सीने थेट मंदिरापर्यंत जाऊ शकता. तेथून थेट टॅक्सीने मंदिरात जाता येते. उडुपी रेल्वे स्टेशन मंदिरापासून फक्त 3.2 किमी अंतरावर आहे, तेथून तुम्ही मंदिरात जाण्यासाठी टॅक्सी किंवा ऑटो भाड्याने घेऊ शकता. तुम्ही स्वतःच्या गाडीने किंवा सरकारी अथवा प्रायव्हेट बसने मंदिरात जाऊ शकता.