(फोटो सौजन्य: Pinterest)
इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन लि. (IRCTC) वेळोवेळी प्रवाशांसाठी काही खास टूर पॅकेज लाँच करत असते. याचे वैशिष्ट्य म्हणजे प्रवाशांना एकाच पॅकेजमध्ये अनेक सुविधा दिल्या जातात आणि तेही कमी पैशात. IRCTC ची टूर पॅकेजेस इतकी स्वस्त आहेत की त्यांचा तुमच्या खिशावर परिणाम होत नाही आणि तुम्ही कोणत्याही त्रासाशिवाय तुमच्या सहलीचे नियोजन सहज करू शकता. यावेळी IRCTC ने उदयपूरचे स्वस्त टूर पॅकेज आणले आहे. बऱ्याच काळापासून येथे भेट देण्याची योजना आखत असाल तर ही तुमच्यासाठी एक उत्तम संधी आहे.
या पॅकेजमध्ये तुम्हाला उदयपूरची सुंदर ठिकाणे दाखवली जातील. ही ठिकाणे इतकी सुंदर आहेत की इथे आल्यावर घरी जावेसे वाटणार नाही. देश-विदेशातून लाखो पर्यटक येथे भेट देण्यासाठी येतात. यासह, एकदा तुम्ही IRCTC टूर पॅकेज घेतल्यानंतर, तुम्हाला कोणतीही वेगळी बुकिंग करण्याची काळजी करण्याची गरज नाही. कारण यात जेवण, ड्रिंक्स आणि राहण्याची सोय या सर्व गोष्टी समाविष्ट आहेत. चला तर मग या टूर पॅकेजविषयी सविस्तर जाणून घेऊया.
IRCTC टूर पॅकेज
आयआरसीटीसीचे हे टूर पॅकेज अशा लोकांसाठी सर्वोत्तम आहे जे दीर्घकाळ प्रवास करण्याचा विचार करत आहेत. टूर पॅकेजचे नाव “दिल्ली ते उदयपूर रेल टूर पॅकेज” आहे, ज्याचा कोड (NJR 040) आहे. हे टूर पॅकेज तुम्ही दर आठवड्याला गुरुवार ते रविवार बुक करू शकता. तुम्हाला जर ए टूर पॅकेज बुक करायचे असेल तर यासाठी तुम्हाला IRCTC च्या अधिकृत वेबसाइट www.irctctourism.com/pacakage वर जावे लागेल. इथून तुम्ही ऑनलाईन घरबसल्या तुमचे तिकीट बुक करू शकता.
किती दिवसांचा आहे टूर पॅकेज?
हे टूर पॅकेज 3 रात्री आणि 4 दिवसांसाठी असेल. सिटी ऑफ लेक्स म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उदयपूरमध्ये तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत सुंदर आठवणी तयार करू शकता. आम्ही तुम्हाला सांगतो, उदयपूर हे राजस्थानमधील सर्वात रोमँटिक आणि सुंदर ठिकाणांपैकी एक आहे. येथील राजवाडे आणि तलावाचे निळे पाणी सर्वांना याकडे आकर्षित करते.
या डेस्टिनेशन्सना केले जाईल कव्हर
आम्ही तुम्हाला सांगतो की, या टूर पॅकेजच्या माध्यमातून प्रवाशांना ट्रेनने प्रवास करण्याची सुविधा दिली जाईल. दर आठवड्याला गुरुवारी ट्रेन क्रमांक 20473 दिल्ली सराय रोहिल्ला रेल्वे स्थानकावरून सुटेल. उदयपूरला पोहोचल्यानंतर, तुम्हाला सहेलियों की बारी, सुखाडिया सर्कल, सिटी पॅलेस म्युझियम, भारतीय लोक कला मंडळाला भेट देण्याची संधी दिली जाईल. तिसऱ्या दिवशी प्रवाशांना एकलिंगजी आणि हल्दीघाटी या प्रेक्षणीय स्थळांना भेट देण्याची संधी दिली जाईल. यासोबतच टूर पॅकेजमध्ये हॉटेलमध्ये राहण्याची सुविधाही समाविष्ट आहे.