Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Women’s Day 2025: महिला दिनानिमित्त बनवा सोलो ट्रीपचा खास प्लॅन; कमी बजेटमध्ये द्या स्वर्गाहून सुंदर या ठिकाणांना भेट

या महिला दिनी तुम्हाला काही खास करायचे असेल, तर एकट्याने सहलीला जा. येथे आम्ही तुम्हाला अशा काही ठिकाणांबद्दल माहिती सांगणार आहोत, जिथे तुम्ही सुरक्षेबरोबरच सुंदर नैसर्गिक सौंदर्याचा आनंद लुटू शकता.

  • By नुपूर भगत
Updated On: Mar 04, 2025 | 10:43 AM
Women's Day 2025: महिला दिनानिमित्त बनवा सोलो ट्रीपचा खास प्लॅन; कमी बजेटमध्ये द्या स्वर्गाहून सुंदर या ठिकाणांना भेट

Women's Day 2025: महिला दिनानिमित्त बनवा सोलो ट्रीपचा खास प्लॅन; कमी बजेटमध्ये द्या स्वर्गाहून सुंदर या ठिकाणांना भेट

Follow Us
Close
Follow Us:

8 मार्च हा दिवस महिलांचा दिवस. जगभर हा दिवस वेगवेगळ्या प्रकारे साजरा काला जातो. महिलांचा आत्मविश्वास आणखी वाढावा यासाठी दरवर्षी महिलादिनानिमित्त अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. तुम्हीही अजूनपर्यंत या दिवसासाठी काही प्लॅन केला नसेल तर सोलो ट्रीप तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय आहे. एकट्याने प्रवास करून तुम्ह तुमचा आत्मविश्वास वाढवू शकता.

जर तुम्हाला सुरक्षित आणि सुंदर हिल स्टेशनवर एकट्याने प्रवासाचा आनंद घ्यायचा असेल तर आजची ही ठिकाणे तुमच्यासाठी परफेक्ट आहेत. या ठिकाणांचे सौंदर्य इतके अलाैकीक आहे की इथे तुम्हाला स्वर्गाचा अनुभव येईल. ही ठिकाणे फक्त नैसर्गिक सौंदर्यानेच परिपूर्ण नाही तर येथील स्थानिक समुदाय पर्यटकांसाठी अनुकूल आणि सुरक्षित मानला जातो. चला तर मग या यादित कोणकोणत्या ठिकाणांचा समावेश आहे ते जाणून घेऊया.

Holi 2025: रंगांनीच नव्हे तर भारतातील या ठिकाणी अनोख्या पद्धतीने खेळली जाते होळी, सण साजरा करण्याच्या विविध परंपरा जाणून घ्या

मनाली

मनाली हे भारतातील सुंदर ठिकाणांपैकी एक आहे. हे एक सुंदर हिल स्टेशन आहे, जिथे बर्फाच्छादित पर्वत, मोहक दऱ्या आणि रोमांचक साहसी खेळ यांचा आनंद लुटु शकता. एकट्याने प्रवास करणाऱ्यांसाठी हे ठिकाण अतिशय सुरक्षित मानले जाते. येथे जाऊन तुम्ही सोलांग व्हॅलीमधील साहसी खेळांचा आनंद घेऊ शकता. एवढेच काय तर इथे पॅराग्लायडिंग, स्कीइंग, स्नोबोर्डिंग असे साहसी खेळही आहेत, जे तुमचा दिवस संस्मरणीय करतील. यानंतर तुम्ही येथे, हिडिंबा देवी मंदिर आणि जोगिनी धबधब्याला भेट देऊ शकता. या सर्व अॅक्टीविटीजनंतर, तुम्ही जुन्या मनाली कॅफेमध्ये आराम करुन दिवसाची शीन घालवू शकता.

औली


तुम्हाला स्कीइंग करायला फार आवडत असेल तर, औली तुमच्यासाठी सर्वोत्तम आहे. येथील शांत दऱ्या आणि सुरक्षित वातावरण एकट्या प्रवासासाठी आदर्श आहे. येथे जाऊन औली येथील कृत्रिम तलाव पहा. स्कीइंग आणि केबल कार राइडचा आनंद लुटा. येथील नैसर्गिक सौदर्यं इतके अनोखे आणि दुर्लभ आहे की इथे एकदा जाताच तुम्हाला तेथून परत येण्याची इच्छाच होणार नाही.

निसर्गाच्या कुशीत वसले आहे भारतातील शेवटचे गाव; स्वर्गात जाण्यासाठी पांडवांनी केला होता इथल्या पुलाचा वापर

दार्जिलिंग

दार्जिलिंगचे सैांदर्य जगभरात प्रसिद्ध आहे. हे हिल स्टेशन चहाची बाग, टॉय ट्रेन आणि कांचनजंगा पर्वताच्या दृश्यांसाठी लोकप्रिय आहे. येथील स्थानिक समुदाय अतिशय मैत्रीपूर्ण आहे, ज्यामुळे एकट्या महिला प्रवाशांना सुरक्षित वाटते. येथे जाऊन तुम्ही टायगर हिलवरून सूर्योदयाचा मनमोहक आनंद लुटु शकता. तसेच
तुम्ही इथे चहाच्या बागा आणि स्थानिक बाजारपेठांना देखील भेट द्या. या ठिकाणांच्या सुंदर वातावरणात तुम्ही तुमचा मोकळा वेळ आनंदात घालवू शकता आणि आपल्या ट्रीपचाही मुक्त आनंद लुटू शकता. ही सोलो ट्रीप नक्कीच तुमच्या फायद्याची ठरेल आणि तुम्ही कधीही न अनुभवलेले नवीन अनुभव तुम्हाला घडवून देईल.

Web Title: Womens day 2025 plan a special solo trip on womens day do visit these beautiful places

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 04, 2025 | 10:43 AM

Topics:  

  • international women's day
  • tourim
  • travel news

संबंधित बातम्या

TT आणि TC दोघांमध्ये काय फरक असतो? कोण तुमचे तिकीट चेक करू शकतो? जाणून घ्या फरक
1

TT आणि TC दोघांमध्ये काय फरक असतो? कोण तुमचे तिकीट चेक करू शकतो? जाणून घ्या फरक

खुले झाले जगातील सर्वात मोठे तीर्थस्थळ, हजारो भाविकांची गर्दी; राष्ट्रपती मुर्मू़ंनेही लावली हजेरी
2

खुले झाले जगातील सर्वात मोठे तीर्थस्थळ, हजारो भाविकांची गर्दी; राष्ट्रपती मुर्मू़ंनेही लावली हजेरी

Travel Trends : भारताचे बदलले पर्यटनचित्र! 2025 ट्रॅव्हल रिपोर्टमध्ये मारली तरुणांनी बाजी; वाचा कसे ते?
3

Travel Trends : भारताचे बदलले पर्यटनचित्र! 2025 ट्रॅव्हल रिपोर्टमध्ये मारली तरुणांनी बाजी; वाचा कसे ते?

Travel News : थेट फ्लाइट्स, सुलभ व्हिसा आणि इंडियन फील; मित्रराष्ट्रातील ‘हे’ शहर बनले आहे भारतीय पर्यटकांसाठी ‘हॉट डेस्टिनेशन’
4

Travel News : थेट फ्लाइट्स, सुलभ व्हिसा आणि इंडियन फील; मित्रराष्ट्रातील ‘हे’ शहर बनले आहे भारतीय पर्यटकांसाठी ‘हॉट डेस्टिनेशन’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.