अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीत विजयी झालेल्या ६८ नवनिर्वाचित नगरसेवकांचा शहराचे ग्रामदैवत श्री विशाल गणेश देवस्थान ट्रस्टतर्फे जाहीर सत्कार करण्यात आला. यावेळी सर्व नगरसेवकांनी श्री गणेशाचे दर्शन घेऊन आपल्या सार्वजनिक कार्याला शुभारंभ केला. प्रथमच महानगरपालिकेत प्रतिनिधित्व करणाऱ्या नगरसेवकांचाही यावेळी गौरव करण्यात आला. निवडणूक काळातील राजकीय मतभेद बाजूला ठेवून शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आणि रोजगारनिर्मितीसाठी एकत्र काम करण्याचे आवाहन देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष ॲड. अभय आगरकर यांनी केले. या कार्यक्रमाला प्रथम महापौर भगवान फुलसौंदर, माजी उपमहापौर अनिल बोरुडे यांच्यासह देवस्थानचे विश्वस्त, नागरिक व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.