Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 27 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ahilyanagar News: हे चाललंय तरी काय? सौर प्रकल्प बसवून देखील शेतकऱ्यांना लाखोंचे वीजबिल! महावितरणच्या कार्यालयात आंदोलन

सरकारच्या सौर ऊर्जा योजनेवर डोळे झाकत विश्वास ठेवून शेतकऱ्यांनी लाखो रुपयांची गुंतवणूक केली. एकंदरीत सौर ऊर्जेमुळे वीजबिल कमी होते. मात्र, इथे शेतकऱ्यांना लाखोंचे वीजबिल आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Mar 06, 2026 | 08:22 PM
सौर प्रकल्प बसवून देखील शेतकऱ्यांना लाखोंचे वीजबिल!

सौर प्रकल्प बसवून देखील शेतकऱ्यांना लाखोंचे वीजबिल!

Follow Us
Follow Us:
  • सरकारच्या सौर ऊर्जा योजनेत मोठी तफावत
  • योजनेत गुंतवणूक करणाऱ्या शेतकऱ्यांनाच आले अवाजवी वीजबिल
  • महावितरणच्या कार्यालयात शेतकऱ्यांकडून आंदोलन
शासनाच्या सौर ऊर्जा (Solar Energy) योजनेवर डोळे झाकून विश्वास ठेवत लाखो रुपयांची गुंतवणूक करणाऱ्या शेतकऱ्यांनाच अवाजवी वीजबिलांचा फटका बसत असल्याची धक्कादायक प्रकरणे अहिल्यानगर जिल्ह्यात समोर आली आहेत. सौर प्रकल्प बसविल्यानंतर वीजबिलात बचत होण्याऐवजी उलट लाखोंची थकबाकी दाखवून वीजपुरवठा खंडित करण्याचे इशारे दिले जात असल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी महावितरणच्या ग्रामीण उपविभागीय कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करीत संबंधित प्रकरणांची तातडीने तांत्रिक चौकशी करण्याची मागणी केली आहे.

Ahilyanagar News: अतिक्रमणाचा प्रश्न चिघळला! जामखेडमध्ये बेमुदत बंदचा इशारा

टाकळी काझी येथील शेतकरी सचिन म्हस्के यांनी महावितरणची विधिवत परवानगी घेऊन ३ किलोवॅट क्षमतेचा सौर प्रकल्प उभारला. सौर ऊर्जेमुळे वीजबिलात मोठी घट होण्याची अपेक्षा असताना, त्यांना उलट हजारोंची थकबाकी दाखवून अवाजवी बिल पाठवण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.

वीजपुरवठा खंडित करणाऱ्यांवर कारवाई करा

तसेच देवगाव येथील शेतकरी गुलाब मोहन वामन यांनी सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून ३ किलोवॅट सौर प्रकल्प बसविला. मात्र त्यांना तब्बल ४ लाख ३२ हजार रुपयांचे अविश्वसनीय व तांत्रिकदृष्ट्या अशक्यप्राय बिल पाठवण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.

शेतकऱ्यांच्या मते, नेट मीटरिंगची योग्य वजावट न करणे, मीटर रीडिंगची अचूक तपासणी न करणे आणि प्रणालीतील त्रुटी वेळेत दुरुस्त न करणे या बाबींमध्ये गंभीर निष्काळजीपणा झाला असल्याचा आरोप करण्यात आला. अवाजवी व चुकीची बिले तात्काळ रद्द करण्यात यावीत. विनाकारण वीजपुरवठा खंडित करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी. जिल्हास्तरावर नेट मीटरिंग संदर्भात विशेष तपासणी समिती स्थापन करावी.

Dharashiv News: धाराशिव पंचायत समितीवर भाजपचा झेंडा! सभापतीपदी गोकर्णा कदम तर उपसभापतीपदी प्रमोद पाटील यांची निवड

लाखोंची बिले लादली

“सौर प्रकल्प बसवणाऱ्या शेतकऱ्यांवर लाखोंची बिले लादून त्यांना आर्थिक संकटात ढकलण्याचा प्रयत्न आम्ही सहन करणार नाही. ही प्रकरणे तातडीने मार्गी लावली नाहीत तर तीव्र आंदोलन छेडले जाईल,” असा इशारा संतप्त शेतकऱ्यांनी दिला आहे. या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश पोटे यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.

 

Web Title: Ahilyanagar news farmers received lakh rupees light bill despite investing in solar energy project

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 06, 2026 | 08:22 PM

Topics:  

  • Ahilyanagar
  • maharashtra news
  • mahavitaran
  • solar energy

संबंधित बातम्या

राज्यासाठी धोक्याची घंटा! एका वर्षात जन्मलिंग गुणोत्तर 912 वरून 897 वर; आरोग्य विभागाच्या अहवालाने चिंता वाढली
1

राज्यासाठी धोक्याची घंटा! एका वर्षात जन्मलिंग गुणोत्तर 912 वरून 897 वर; आरोग्य विभागाच्या अहवालाने चिंता वाढली

लातूर पोलिसांचा दणका:- वाहनचोरी करणाऱ्या आरोपीला अटक ६ मोटारसायकली पोलिसांच्या ताब्यात
2

लातूर पोलिसांचा दणका:- वाहनचोरी करणाऱ्या आरोपीला अटक ६ मोटारसायकली पोलिसांच्या ताब्यात

AHILYANAGAR : साई सेवा पतसंस्थेविरोधात ठेवीदार आक्रमक; MPID अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी
3

AHILYANAGAR : साई सेवा पतसंस्थेविरोधात ठेवीदार आक्रमक; MPID अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी

Farmers Loan Waiver: ५६ लाख शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! ३० जूनपूर्वी कर्जमाफीची प्रक्रिया पूर्ण करण्याचा सरकारचा मोठा निर्णय
4

Farmers Loan Waiver: ५६ लाख शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! ३० जूनपूर्वी कर्जमाफीची प्रक्रिया पूर्ण करण्याचा सरकारचा मोठा निर्णय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.