
अहिल्यानगर शहरात बहुप्रतिक्षित छत्रपती संभाजी महाराजांचा पुर्णाकृती पुतळा उभारण्यात आला आहे.त्याच लोकार्पण आज शहराचे आमदार संग्राम जगताप, महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांच्यासह इतर मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. खरंतर या पुतळ्याचा लोकार्पण सोहळा उद्या जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील माजी खासदार सुजय विखे आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत होणार होते.मात्र नुकतेच राज्यात महापालिका निवडणूक आचारसंहिता लागली असल्याने आजच घाईघाईने हा लोकार्पण सोहळा उरकून घेण्यात आला.