अहिल्यानगर महानगरपालिकेच्या निवडणुकीचे बिगुल वाजल्याने शहरासह उपनगरातील राजकीय वातावरण तापू लागले आहे. तब्बल दोन वर्षांनंतर होत असलेल्या या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांत इच्छुक उमेदवारांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. गेल्या काही वर्षांत उपनगरांमध्ये काही प्रमाणात विकासकामे झाली असली, तरी पाणीपुरवठा, आरोग्य सुविधा, सांडपाणी व्यवस्था, मोक्षधाम, उद्याने आदी अनेक मूलभूत समस्या अद्यापही प्रलंबित असल्याने नागरिकांमध्ये नाराजीची भावना आहे.