शेवगाव येथील वकील संघाचे सदस्य अॅड. रविंद्र प्रकाश सकट यांच्यावर काल न्यायालय परिसरातच विरोधी पक्षकाराने प्राणघातक हल्ला केल्याची एक अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. न्यायव्यवस्थेच्या सुरक्षिततेवर आणि वकिलांच्या प्रतिष्ठेवर थेट घाला घालणाऱ्या या घटनेचा शेवगाव तालुका बार असोशिएशनने तीव्र निषेध नोंदविला आहे. वकिलांवरील वाढत्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर ही घटना गंभीर मानली जात आहे. या निषेधार्थ, आज शेवगाव येथील सर्व वकील सदस्यांनी न्यायालयीन कामकाजापासून अलिप्त राहण्याचा ठराव एकमताने पारित केला आहे. शेवगाव तालुका बार असोशिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी प्रधान न्यायाधीशांना निवेदन सादर करून, वकिलांच्या अनुपस्थितीत पक्षकारांविरुद्ध कोणतेही प्रतिकूल आदेश पारित न करण्याची विनंती केली आहे. तसेच, वकील संघाच्या वतीने हल्लेखोरावर कठोर पोलीस कारवाईची मागणी करण्यात आली आहे.