
Maharashtra Rain Alert: 'या' जिल्ह्यांच्या नागरिकांनी घरातच थांबा; IMD च्या अलर्टने वाढली चिंता
महाराष्ट्राला मुसळधार पावसाचा इशारा
अहिल्यानगर जिल्ह्यात पावसाचा अंदाज
धरणातून पाणी सोडल्यास पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता
अहिल्यानगर: भारतीय हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार २७ ते २९ ऑक्टोंबर या कालावधीत अहिल्यानगर जिल्ह्यात वीजांचा कडकडाट, जोरदार वारे व हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या पाश्र्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने अहिल्यानगर जिल्ह्यासाठी ‘यलो अलर्ट जारी करून नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
पुणे, नाशिक, अहिल्यानगर, बोड, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात मध्यम ते मुसळधार स्वरुपाचे पर्जन्यमान झाल्यास जिल्ह्यातून वाहणाऱ्या नद्यांवरील धरणातून सोडलेल्या विसर्गामुळे पाणी पातळीत वाढ होऊ शकते. त्यापार्श्वभूमीवर नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून करण्यात आले आहे.
मेघगर्जनेच्या वेळी, विजा चमकत असताना किंवा वादळीवारे वाहत असतांना झाडाखाली किंवा झाडांजवळ उभे राहू नये. वीजेपासून बचावासाठी सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा. डगडाटीच्या वादळादरम्यान व विजा चमकांना कोणत्याही विद्युत पकरणांचा वापर करू नये, वीजेच्या सुवाहक भागांशी संपर्क टाळावा, क्टर्स, शेतीची अवजारे, मोटारसायकल, सायकल यांचेपासून दूर रहावे. किळे मैदान, झाडाखाली, टॉवर्स, ध्वजांचे खांब, विद्युत, दिव्यांचे खांब, बातूचे कुंपण, विदयुतवाहिनी अथवा ट्रॉन्सफॉर्मजवळ थांबू नये. सर्व कारच्या अधांतरी लटकणाऱ्या, लोंबणाऱ्या केबल्स् पासून दूर रहावे.
Maharashtra Rain Alert: राज्यावर भीषण संकट; स्वेटर काढा अन् रेनकोट घाला, वादळी वारे, विजांसह…
नदी, ओबे व नाल्याकाठच्या नागरिकांनी दक्ष रहावे पाणीपातळीत वाढ होत असल्यास नागरिकांनी नदीपात्रापासुन तसेच ओढे व नाले यापासून दूर रहावे व सुरक्षीत स्थळी स्थलांतर करावे. नदी, ओढे-नाल्यांवरील पुल व बंधा-यांवरून पाणी वाहत असल्यास पुल, बंधारे ओलांडू नये. नागरिकांनी स्थानिक प्रशासनाने दिलेल्या सुचनांचे पालन करावे.
आपत्कालीन परिस्थिती उद्भवण्यापूर्वीच सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे, गुनाट, मोडवाळीस आलेल्या व धोकादायक इमारतीमध्ये आश्रय घेऊ नये. अतिवृष्टीमुळे भूस्खलन होण्याची व दरडी कोसळण्याची शक्यता असते. त्यादृष्टीने डोंगराच्या पायाण्याशी राहणा-या लोकानी दक्षता घ्यावी व वेळीच सुरक्षीत स्थळी स्थलांतर करावे. घाट रस्त्याने प्रवास करणे शक्यतो टाळावे. जनावरांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे, असे आवाहन नागरिकांना जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेले आहे.
जाहिरात फलक कोसळून होणाऱ्या दूर्घटना टाळण्यासाठी दक्षतेची बाब माणून जाहिरात फलकांच्या आजूबाजूला थांबू नये व योग्य ती दक्षता घ्यावी, विजा चमकत असताना मोकळ्या जागेवर असल्यास सुरक्षेसाठी गुडघ्यावर बसून हाताने आपले कान झाकावे व आपले डोके दोन्ही गुडघ्यांच्यामध्ये झाकावे, जमीनीही कमीतकमी संपर्क असावा. धरण व नदीक्षेत्रामध्ये पर्यटनासाठी जाण्णान्या नागरिकांनी विशेष खबरदारी घ्यावी, धरणाचे पाण्यात वा नदीच्या पाण्याच्या प्रवाहामध्ये उत्तरू नये, धोकादायक विकाणी सेल्फी काढू नये.