अहिल्यानगर जिल्ह्यात रक्ताचा तुटवडा गंभीर बनला आहे. जिल्ह्यातील 17 रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचा साठा कमी होत असल्याची माहिती समोर आली आहे. जिल्ह्याला दर महिन्याला सुमारे 10 हजार रक्तपिशव्यांची गरज असताना प्रत्यक्षात केवळ 5 हजार रक्तपिशव्यांचे संकलन होत आहे.
जिल्ह्यात थॅलेसेमियाचे 450 रुग्ण असून या रुग्णांना दर महिन्याला 500 पेक्षा अधिक रक्तपिशव्यांची आवश्यकता असते. दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे शाळा-महाविद्यालयांमधील रक्तदान शिबिरे कमी झाल्याने रक्तसाठ्यावर परिणाम झाल्याचे जनकल्याण रक्तपेढीच्या व्यवस्थापकांनी सांगितले.
नागरिकांनी रक्तदान शिबिरे आयोजित करावीत आणि रक्तपेढ्यांमध्ये जाऊन रक्तदान करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.