अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला मंजुरी मिळाली आहे. या वैद्यकीय महाविद्यालयाच्या श्रेयवादानंतर आता वैद्यकीय महाविद्यालय आपल्याच तालुक्यामध्ये होण्यासाठी अनेक राजकीय पुढाऱ्यांनी सरकारकडे निवेदने देण्यास सुरुवात केली आहे. तत्पूर्वी हे शासकीय महाविद्यालय प्राथमिक तत्वावर शिर्डी येथे सुरू होणार असल्याचे समजताच खासदार निलेश लंके यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेवून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अहिल्यानगर शहराच्या लगतच व्हावे अशी मागणी केली होती. त्यावेळी शहराजवळील उपलब्ध जागा महाविद्यालयासाठी देखील जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आले होते. त्यानंतर पत्रकार परिषद घेत खासदार निलेश लंके यांनी शासकीय महाविद्यालय शहराजवळ करण्याची मागणी करत शिर्डी येथील वैद्यकीय महाविद्यालयाला अप्रत्यक्ष विरोध दर्शवला होता. वैद्यकीय महाविद्यालय शहराच्या बाहेर गेले तर वेळप्रसंगी आंदोलन हाती घेऊ असे खासदार निलेश लंके यांनी पत्रकार परिषदेत सांगितले होते.