गेल्या काही दिवसांपूर्वी जम्मू काश्मीर येथील पहेलगाम भागामध्ये पर्यटनासाठी गेलेल्या पर्यटकांवर अतिरेक्यांनी बेछूट गोळीबार केला. या गोळीबारात अनेक पर्यटकांना आपला जीव गमवावा लागला. या भ्याड हल्ल्यानंतर देशभरासह जगभरातून दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध नोंदवण्यात आला तर देशामध्ये या हल्ल्यानंतर एक संतापाची लाट उसळल्याचे पहायला मिळाले. त्यानंतर भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूर राबवीत पाकिस्तानमधील आतंकवाद्यांचे 9 तळ उध्वस्त करत दहशतवादाला जोरदार प्रत्युत्तर दिले होते. त्यानंतर पाकिस्तानकडून देखील भारतावर ड्रोन द्वारे हल्ला करण्याचा प्रयत्न केला गेला परंतु भारतीय सैन्याने त्याचे जोरदार प्रत्युत्तर देत पाकिस्तानला नमविले. या सर्व घटनाानंतर भारतात पाकिस्तान बद्दल प्रचंड चीड निर्माण झाली होती. यातूनच भारतातून पाक शब्दाचा नामोल्लेख टाळावा अशी मागणी देखील जोर धरू लागली होती. याच पार्श्वभूमीवर अहिल्यानगर शहरातील मधुर मिठाई या मिठाई व्यवसायाचे संचालक पुरोहित कुटुंबीयांनी बकरी ईदच्या दिवशी नवा निर्णय घेत आपल्या दुकानांमध्ये असलेल्या म्हैसूर पाक व डिंक पाक या मिठायांचे नाव बदलून म्हैसूर श्री व डिंक बर्फी असे ठेवण्यात आले. त्यांचे या निर्णयाला नगरकरांकडून देखील आता मोठा प्रतिसाद मिळत असून अनेकांनी त्यांच्या निर्णयाचे स्वागत केले आहे.