राहुरी तालुक्यातील जोगेश्वरी आखाडा परिसरात नगरपरिषदेच्या प्राथमिक शाळेच्या भिंतीवर बिबट्याचे दर्शन झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. १९ तारखेला हा प्रकार घडल्याची माहिती स्थानिकांनी दिली असून संबंधित व्हिडिओ सध्या समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे बिबट्या शाळेच्या भिंतीवर दिसला त्याचवेळी शेजारीच शिवजयंतीचा कार्यक्रम सुरू होता. कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने महिला, लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते. अचानक बिबट्याचे दर्शन झाल्याने काही काळ घबराटीचे वातावरण निर्माण झाले. गेल्या काही दिवसांपासून या परिसरात बिबट्याचा सातत्याने वावर असल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे. शाळेजवळच त्याचे वास्तव्य असल्याने पालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. वनविभागाने तातडीने पिंजरा लावून बिबट्याला पकडावे, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.