Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 12 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ahilyanagar News: शिर्डीत उभारली जाणार ‘शिवसृष्टी’; 10 कोटी रुपयांचा निधी मंजूर, लवकरच प्रत्यक्ष कामाला सुरुवात

डॉ. सुजय विखे पाटील यांच्या पाठ पुराव्यानंतर शिर्डीत शिवसृष्टी उभारली जाणार आहे. या प्रक्लपासाठी 10 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Feb 21, 2026 | 08:24 PM
शिर्डीत उभारली जाणार ‘शिवसृष्टी

शिर्डीत उभारली जाणार ‘शिवसृष्टी

Follow Us
Follow Us:
  • शिर्डीत ‘शिवसृष्टी’ प्रकल्पाला मंजुरी
  • या प्रकल्पासाठी 10 कोटी रुपयांचा निधी मंजूर
  • डॉ. सुजय विखे पाटलांनी दिली माहिती
छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याच्या विचारांना शिर्डीत भव्य रूप देण्यासाठी १० कोटी रुपयांच्या ‘शिवसृष्टी’ प्रकल्पाला मंजुरी मिळाली असून, वर्क ऑर्डर प्राप्त झाली आहे. त्यामुळे लवकरच या ऐतिहासिक प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार असल्याची माहिती माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिली.

छत्रपती शासन आणि युवा शिर्डी ग्रामस्थ यांच्या वतीने आयोजित शिवजयंतीनिमित्त कार्यक्रमात बोलताना त्यांनी शिर्डीमध्ये शिवसृष्टी उभारण्याचा संकल्प व्यक्त केला. यावेळी नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, नगरसेवक-नगरसेविका, विविध पदाधिकारी तसेच मोठ्या संख्येने उपस्थित माता-भगिनी व ग्रामस्थ उपस्थित होते.

Ahilyanagar Crime: अल्पवयीन मुलीचे अपहरण अन् मग जंगलात नेऊन लैंगिक अत्याचार! प्रकरणाला ‘लव्ह जिहाद’चे स्वरूप

डॉ. सुजय विखे म्हणाले, की सालाबादप्रमाणे शिर्डी परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. युवा शिर्डी ग्रामस्थ आणि छत्रपती शासन या दोन्ही संघटनांच्या माध्यमातून युवकांना सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांद्वारे योग्य दिशा देण्याचे काम सुरू असून, शिर्डीचे भविष्य हे या युवकांच्या खांद्यावर आहे. विविध उपक्रमांच्या माध्यमातून युवकांमध्ये संघटनात्मक व सामाजिक जाणीव निर्माण करण्याचे कार्य या संघटनांकडून सातत्याने होत असल्याबद्दल त्यांनी कौतुक करीत सर्वतोपरी सहकार्याचे आश्वासन दिले.

युवा शिर्डी आणि छत्रपती शासन या संघटनांचे कार्य उल्लेखनीय

डॉ. विखे पाटील म्हणाले, की युवा शिर्डी ग्रामस्थ आणि छत्रपती शासन या दोन्ही संघटनांचे सामाजिक कार्य उल्लेखनीय असून युवकांना योग्य दिशा देण्याचे काम विविध सामाजिक, क्रीडा आणि सांस्कृतिक उपक्रमांच्या माध्यमातून सातत्याने सुरू आहे. नुकत्याच पार पडलेल्या भव्य क्रिकेट स्पर्धेसह विविध उपक्रमांमधून शिर्डीतील युवकांमध्ये संघटनात्मक व सामाजिक जाणीव निर्माण करण्याचे कार्य या दोन्ही संघटनांच्या माध्यमातून प्रभावीपणे होत आहे.

‘साईंची भूमी-स्वच्छतेची हमी’

छत्रपती शासन यांच्या वतीने ‘ साईंची भूमी स्वच्छतेची हमी’ हा उपक्रम राबविण्यात येत असून आंतरराष्ट्रीय कीर्तीचे साईनगरी स्वच्छ व सुंदर ठेवणे ही प्रत्येक शिर्डीकराची जबाबदारी आहे. सार्वजनिक ठिकाणी धुंकणे, कचरा टाकणे अथवा घाण करणाऱ्या व्यक्तींचे छायाचित्र काढून छत्रपती शासन यांना सादर केल्यास ५०० रुपये बक्षीस देण्याचा उपक्रम हाती घेतल्याबद्दल डॉ. सुजय विखे पाटील यांनी छत्रपती शासन यांचे आभार व्यक्त केले.

इरिगेशन विभागाच्या जागेची झाली पाहणी

महाराष्ट्रातील सर्व नगरपंचायती आणि नगरपरिषदांमध्ये आदर्श ठरेल अशी ही भव्य शिवसृष्टी उभारण्यात येणार असल्याचा विश्वास व्यक्त करताना त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेवेळी सर्व धर्म व घटकांना सोबत घेण्याचा विचार आजही मार्गदर्शक असल्याचे त्यांनी नमूद केले. छत्रपती शिवाजी महाराजांना शोभेल असा विकास आपण शिर्डीत करणार आहोत. बसस्थानकासमोरील इरिगेशन विभागाच्या जागेची पाहणी केली असून, शिवसृष्टीचे काम तातडीने सुरू करण्यात येईल, असे डॉ. विखे पाटील यांनी सांगितले.

Web Title: Shivsrushti project built in shirdi 10 crore rupees fund announced

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 21, 2026 | 08:23 PM

Topics:  

  • Ahilyanagar
  • shirdi
  • Sujay Vikhe-Patil

संबंधित बातम्या

Sai Baba Story: आयुष्य घडवणाऱ्या साईबांबाची प्रमुख तत्व कोणती? जाणून घ्या
1

Sai Baba Story: आयुष्य घडवणाऱ्या साईबांबाची प्रमुख तत्व कोणती? जाणून घ्या

Ahilyanagar Crime News : आधी दुकानदाराला बेदम मारहाण, मग थेट पोलिसांनाच दमदाटी!
2

Ahilyanagar Crime News : आधी दुकानदाराला बेदम मारहाण, मग थेट पोलिसांनाच दमदाटी!

Ahilyanagar News: भीमा नदीला महापूर; श्रीगोंद्यातील आर्वी बेटाचा संपर्क तुटला, 200 ग्रामस्थ अडकले
3

Ahilyanagar News: भीमा नदीला महापूर; श्रीगोंद्यातील आर्वी बेटाचा संपर्क तुटला, 200 ग्रामस्थ अडकले

Ahilyanagar News : विजेच्या खांबाला हात लागल्याने साडेतीन वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी मृत्यू!
4

Ahilyanagar News : विजेच्या खांबाला हात लागल्याने साडेतीन वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी मृत्यू!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.