राष्ट्रीय महामार्ग क्र. 761(बेल्हा ते राळेगण थेरपाळ) च्या निकृष्ट दर्जाच्या कामामुळे आणि भूसंपादन भरपाईतील विलंबामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी निघोज बस स्थानकावर सुमारे दोन तास रास्ता रोको आंदोलन केले. ग्रामस्थांनी वारंवार तक्रारी करूनही परिस्थिती न सुधारल्याने, त्यांनी रस्त्याचे निकृष्ट काम, शेतीसाठी 100 मीटरवर पाण्याची पाईप सुविधा, प्रत्येक गावात अधिकृत बस थांबा, निघोजमध्ये सर्व्हिस रोड तसेच ठेकेदार कर्मचाऱ्यांकडून होणारे उद्धट वर्तन या प्रमुख मागण्यांसह एकूण 14 मागण्या अधिकाऱ्यांपुढे ठेवल्या. अखेरीस, बांधकाम विभाग, भूमी अभिलेख आणि जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी आंदोलकांची भेट घेऊन त्यांच्या भावना जाणून घेतल्या. यावेळी मागण्या मान्य होईपर्यंत काम बंद ठेवण्याच्या ग्रामस्थांच्या निर्णयानंतर रस्ता रोको आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले. महामार्गाच्या कामातील अनियमितता आणि प्रशासनाच्या निष्क्रिय भूमिकेवर निघोजसह महामार्ग लगतच्या गावातील ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.