अहिल्यानगर तालुक्यामध्ये दोन दिवसापूर्वी ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने तालुक्यातील नद्यांना पूर आल्याने अनेक गावांमध्ये मोठे नुकसान झाले आहे. आज अहिल्यानगर दक्षिणचे खासदार निलेश लंके यांनी पूरग्रस्त भागाची पाहणी करत असताना पुरामुळे संपूर्ण संसार उघड्यावर पडलेल्या कुटुंबांना भेट देत त्यांना धीर देण्याचे काम केले. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांनी आणलेल्या किराणा किटचे पूरग्रस्त कुटुंबांमध्ये वितरण केले. यावेळी पूरग्रस्त महिलांनी माध्यमांशी संवाद साधताना आपल्या भावना व्यक्त करत सांगितले की किराणा किट ऐवजी आम्हाला मूलभूत सुविधा तात्काळ द्यावेत. एक वेळ किराणा, चारा येईल परंतु मूलभूत सुविधांमुळे अनेक कामे रखडले आहेत. त्यामुळे शासनाने सर्वप्रथम आमचे रस्ते व वीज तसेच नदीवरील बंधाऱ्यांचे गेट त्वरित उघडून द्यावेत अशी मागणी केली आहे.