अलिबाग तालुक्यात ग्रामपंचायतींकडून बांधकाम परवानगीचा अधिकार काढून थेट जिल्हाधिकारी कार्यालयाकडे गेल्यापासून नियमबाह्य परवानग्या दिल्या जात असल्याचा आरोप माजी आमदार पंडित पाटील यांनी केला असून, स्थानिक कचरा व्यवस्थापन कोलमडलेले असताना आंबेपूर व पोयनाड परिसरात सात मजली इमारतींना परवानग्या कशा दिल्या जात आहेत, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. पाणी वाहतुकीच्या नैसर्गिक मार्गावर भराव टाकून पेट्रोल पंपाला मंजुरी देण्यात आल्याने भविष्यात मिठी नदी किंवा पुण्यातील पुरस्थितीसारखा धोका अलिबागला उद्भवू शकतो, असा इशारा देत त्यांनी या सर्व प्रकरणांवर न्यायालयाच्या दालनात जाण्याची तयारी दर्शवली आहे.