अंबरनाथ पूर्वेतील बिकेबिन रोड परिसरात रात्री उशिरा रासायनिक वायूचा प्रसार झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. या धुरामुळे नागरिकांना डोळ्यांत जळजळ, घशात चुरचुरी, तसेच श्वास घेण्यास त्रास जाणवला. काही वेळातच हा रासायनिक धूर शहराच्या इतर भागांतही पसरल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले. धुरामुळे रस्ते आणि रेल्वे मार्गावर दृश्यमानता कमी झाली होती, ज्यामुळे वाहतुकीवरही परिणाम झाला. नागरिकांच्या तक्रारीनंतर अग्निशमन दल आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न केले असून, या घटनेच्या कारणाचा शोध घेण्यासाठी प्रशासनाकडून तपास सुरू आहे.