लोकशाहीमध्ये हिंसाचाराला कोणतंही स्थान नाही. विचार आणि मतभिन्नता असू शकते, पण ती व्यक्त करण्यासाठी किंवा विरोध दर्शवण्यासाठी हल्ल्यासारख्या कृतीचा वापर करणं हे अत्यंत निंदनीय आहे.प्रवीणदादांवरील हा हल्ला म्हणजे केवळ एका व्यक्तीवर नाही, तर लोकशाही मूल्यांवर आणि महाराष्ट्राच्या शांतताप्रिय संस्कृतीवर केलेला हल्ला आहे. आपण सर्वांनी एकत्र येऊन अशा प्रवृत्तींचा निषेध केला पाहिजे आणि महाराष्ट्र धर्म वाढवण्यासाठी कटिबद्ध राहिले पाहिजे, जिथे सलोखा, शांतता आणि विचारांचा आदर केला जातो. या हल्ल्यामागील सूत्रधारांचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी आम्ही प्रशासनाकडे मागणी करतो.