पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं असून या पावसाचा फटका वारकऱ्यांना देखील बसला आहे. वनवेवाडी डोंगरातील पालखी रस्ताच बंद झाल्याने याचा नाहक त्रास वारकऱ्यांना झाला आहे. पांडुरंगा रस्ता नाही वारीला आम्ही कसे येणार पंढरीला, असं म्हणत वारकऱ्यांनी विठूरायाला साकडं घातलं आहे. संत वामनभाऊ महाराज यांच्या पालखी सोहळयाला 125 वर्षाची परंपरा आहे. मराठवाड्यातील एकमेव स्वतंत्र पालखी सोहळा असून दिड लाख वारकऱ्यांची एकमेव दिंडी जात असते.