आष्टी तालुक्यात जलजीवन मिशन अंतर्गत सुरू असलेली नळयोजना चार वर्षांपासून अर्धवट अवस्थेत आहे. यामुळे नागरिकांना अजूनही पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. याच पार्श्वभूमीवर मनसे शेतकरी सेनेचे कैलास दरेकर यांनी पंचायत समिती कार्यालयात अनोख्या पद्धतीने आंदोलन करत ‘कोंबडं घ्या, पण जलजीवनचे पाणी द्या’ अशी मागणी केली.जलजीवन मिशन अंतर्गत ‘हर घर जल’ ही पंतप्रधान नरेंद्र मोदींची महत्त्वाकांक्षी योजना असून, आष्टी, पाटोदा व शिरूर कासार या तीन तालुक्यांतील शेकडो गावे अद्यापही पाण्यावाचून आहेत. कंत्राटदार व अधिकाऱ्यांच्या अभद्र युतीमुळे भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप देखील करण्यात आला आहे.