आमदार प्रकाश सोळंके यांनी बीड जिल्ह्यातील सामाजिक समीकरणांवर मोठं राजकीय वक्तव्य केलं आहे. बहुजन समाजाला आजपर्यंत मंत्रीपद मिळालं नाही, ही खंत त्यांनी प्रसारमाध्यमांसमोर व्यक्त केली. मात्र, आमदार धनंजय मुंडे यांच्या मंत्रीपदाला आपला कुठलाही विरोध नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं असून त्यांना शुभेच्छाही दिल्या. दरम्यान, वडवणीतील राजाभाऊ मुंडे आणि त्यांचे पुत्र बाबरी मुंडे यांनी भाजपचा राजीनामा देऊन अजित पवारांच्या गटात जाण्याचा निर्णय घेतल्याची माहितीही त्यांनी दिली. येत्या 7 ऑगस्टला मोठा पक्षप्रवेश सोहळा वडवणीत पार पडणार असल्याचं आमदार सोळंके यांनी सांगितलं आहे.