धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात लंपी आजाराने पुन्हा डोके वर काढले असून ग्रामीण भागातील शेतकरी वर्ग मोठ्या संकटात सापडला आहे. गेल्या काही दिवसांत तालुक्यातील विविध गावांमध्ये दोन ते तीन जनावरांच्या मृत्यूची नोंद झाली आहे, तर अनेक जनावरे आजारी पडल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. ताप, अंगावर गाठी येणे, भूक मंदावणे आणि अंगदुखी अशी लक्षणे मोठ्या प्रमाणात दिसत आहेत.विशेष म्हणजे, दोन महिन्यांपूर्वीच पशुवैद्यकीय विभागाकडून लंपी आजारावरील लसीकरण मोहिम राबवण्यात आली होती. मात्र, लसीकरणानंतरही आजार झपाट्याने पसरत असल्याने शेतकरी वर्गात संभ्रम निर्माण झाला आहे. अनेक शेतकरी लसीच्या कार्यक्षमतेबद्दल प्रश्न उपस्थित करत आहेत.