Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nanded News : सफाई कामगारांचे काम बंद आंदोलन अखेर मागे! दोन सुपरवायझर सफाई कामातून दूर

नांदेडमध्ये 7०० सफाई कामगारांनी २७ फेब्रुवारी रोजी सकाळी सहापासून कामबंद पुकारत शहरातील स्वच्छता व्यवस्था ठप्प केली होती. मागणी मान्य झाल्यानंतर आंदोलन मागे घेतले.

  • By प्रीति माने
Updated On: Mar 01, 2026 | 05:13 PM
700 sanitation workers' strike ends after three days Nanded News

700 sanitation workers' strike ends after three days Nanded News

Follow Us
Follow Us:

Nanded News : नांदेड : नांदेड-वाघाळा शहर महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागातील कामगारांनी पुकारलेले कामबंद आंदोलन अखेर प्रशासनाने माघार घेतल्यानंतर मागे घेण्यात आले. (Nanded News) अमृत इंटरप्राईजेस कंपनीत कार्यरत सुमारे ७०० सफाई कामगारांनी २७ फेब्रुवारी रोजी सकाळी सहापासून कामबंद पुकारत शहरातील स्वच्छता व्यवस्था ठप्प केली होती. दोन कंत्राटी सुपरवायझरांकडून होत असलेल्या कथित गैरवर्तन, दमदाटी व मानसिक छळाच्या निषेधार्थ कामगारांनी आंदोलन छेडले होते. (Maharashtra News)

सफाई कर्मचाऱ्यांच्या कामबंद आंदोलनाच्या परिणामी शहरात कचऱ्याचे डीग साचून नागरिक त्रस्त झाले. प्रशासनाने सुरुवातीला ठोस भूमिका न घेतल्याचा आरोप युनियनने केला. अखेर परिस्थिती गंभीर होताच महापौर कविता मुळे यांच्या दालनात तातडीची बैठक घेण्यात आली. या बैठकीत महापौर, उपमहापौर, प्रशासनाचे अधिकारी, नगरसेवक आणि अमृत इंटरप्राईजेसचे प्रतिनिधी उपस्थित होते.

हे देखील वाचा : MSC Bank Scam सुनेत्रा पवारांना मोठा दिलासा; शिखर बँक गैरव्यवहार प्रकरणाला पूर्णविराम

कामावर घेण्यासाठी पुन्हा होणार बैठक

चर्चेनंतर संबंधित दोन सुपरवायझरांना नाली व झाडू सफाई कामातून दूर करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला. तसेच’ घरी बसून पगार घेत’ असल्याचा आरोप असलेल्या तीन ते चार कर्मचाऱ्यांबाबत चार ते पाच दिवसांत निर्णय घेण्याचे आश्वासन देण्यात आले. याशिवाय यापूर्वी कमी करण्यात आलेल्या सुमारे १०० सफाई कामगारांना पुन्हा कामावर घेण्याबाबत पुढील आठवड्यात बैठक घेण्याचेही मान्य करण्यात आले.

कारवाईचा इशारा

दरम्यान, कोणतीही पूर्वसूचना न देता स्वच्छता सेवा बंद ठेवल्याबद्दल महापालिकेने अमृत इंटरप्राईजेसला नोटीस बजावली होती. पर्यायी व्यवस्था न केल्यास दंडात्मक कारवाईचा इशाराही देण्यात आला होता. युनियनच्या प्रमुख मागण्या मान्य झाल्यानंतर कामगारांनी दुपारी चार वाजेनंतर कामबंद आंदोलन मागे घेतले असून स्वच्छतेच्या कामास सुरूवात केली आहे, अशी माहिती युनियनचे अध्यक्ष गणेश शिंगे यांनी दिली. असून आश्वासनांची अंमलबजावणी न झाल्यास पुढील आठवड्यात पुन्हा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शिंगे यांनी दिला आहे.

हे देखील वाचा : PM Modi in Puducherry: “पुद्दुचेरीला दिल्लीतील एका कुटुंबासाठी ATM बनवले…; PM मोदींचा भाषणातून काँग्रेसवर निशाणा

अर्धापूरमध्ये हॉटेल चालकास मारहाण

अर्धापूर तालुक्यातील तामसा कॉर्नर येथील हरीओम हॉटेलमध्ये नाश्ता करून पैसे न देता हॉटेल चालकास शिवीगाळ, मारहाण करत दरमहा १० हजार रुपयांची खंडणी मागितल्याची गंभीर घटना घडली आहे. या प्रकरणी अर्धापूर पोलीस ठाण्यात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना दिनांक २५ फेब्रुवारी रोजी दुपारी २ वाजता तसेच २६ फेब्रुवारी रोजी दुपारी २.३० वाजण्याच्या सुमारास तामसा कॉर्नर येथील हरीओम हॉटेलमध्ये घडली. आरोपी मन्मथ हिंगमिरे, शुभम कल्याणकर, गोविंद कानोडे व विनोद साखरे यांनी संगनमत करून हॉटेलमध्ये नाश्ता केला. त्यानंतर नाश्त्याचे पैसे न देता हॉटेल चालक आनंदा अशोक येळगे (वय ३८, रा. आंबेगाव ता. अर्धापूर, सध्या रा. तामसा कॉर्नर अर्धापूर) यांना शिवीगाळ करत थप्पड व बुक्क्यांनी मारहाण केली. यावेळी आरोपींनी अर्धापूरमध्ये हॉटेल चालवायचे असेल तर दरमहा १० हजार रुपये द्यावे लागतील,’ अशी खंडणीची मागणी केली तसेच पैसे न दिल्यास जीवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

Web Title: 700 sanitation workers strike ends after three days nanded news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 01, 2026 | 05:13 PM

Topics:  

  • maharashtra news
  • Nanded
  • nanded news

संबंधित बातम्या

Maharashtra Drought: कृषिमंत्री थेट बांधावर; सोयाबीन नुकसानीची केली पाहणी, लवकरच…
1

Maharashtra Drought: कृषिमंत्री थेट बांधावर; सोयाबीन नुकसानीची केली पाहणी, लवकरच…

Satara News: अंत्यविधीला येणाऱ्यांसाठी ‘ही’ सुविधा ठरणार मोठा आधार; महिला-पुरुषांसाठी स्वतंत्र व्यवस्था
2

Satara News: अंत्यविधीला येणाऱ्यांसाठी ‘ही’ सुविधा ठरणार मोठा आधार; महिला-पुरुषांसाठी स्वतंत्र व्यवस्था

नांदेड हादरलं! ५० हजारांच्या हुंड्यासाठी केला छळ; विवाहितेने गळफास घेऊन संपवलं जीवन
3

नांदेड हादरलं! ५० हजारांच्या हुंड्यासाठी केला छळ; विवाहितेने गळफास घेऊन संपवलं जीवन

Jalgaon Ganesh Visarjan 2026: विसर्जन मिरवणुकीआधी पोलिसांचा मोठा निर्णय! DJ बाबत गणेश मंडळांना दिला स्पष्ट इशारा
4

Jalgaon Ganesh Visarjan 2026: विसर्जन मिरवणुकीआधी पोलिसांचा मोठा निर्णय! DJ बाबत गणेश मंडळांना दिला स्पष्ट इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.