मंत्री गणेश नाईक यांनी ठाण्यात जनता दरबार घेणार असल्याचं स्पष्ट केल्यानंतर एकनाथ शिंदे यांना शह देण्यासाठी गणेश नाईक यांचा ठाण्यातील जनता दरबार असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं .त्यातच आता 24 फेब्रुवारीला ठाण्यातील जनता दरबार हा सर्व ठाणेकरांसाठी असणार असून त्यापुढे ठाण्यातील प्रत्येक तालुक्यात असे जनता दरबार घेणार असल्याचं गणेश नाईक यांनी आज पुन्हा एकदा स्पष्ट केलं. राज्यातील प्रत्येक मंत्र्याने प्रत्येक तालुक्यात जाऊन जनता दरबार घ्यावा अस आवाहन देखील यावेळी मंत्री गणेश नाईक यांनी केल असून त्यांच्या या जनता दरबारामुळे पुन्हा एकदा शिवसेना आणि भाजप यांच्यात ठाण्यात कॉल्ड वॉर सुरू होणार असल्याच चित्र आहे . आज पालघर मध्ये पालकमंत्री गणेश नाईक यांच्या अध्यक्षतेखाली जनता दरबार पार पडला असून यावेळी 700 पेक्षा अधिक अर्ज स्वतः गणेश नाईक यांनी तपासून येत्या पंधरा दिवसाच्या आत हे सर्व निकाली काढण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाला दिले आहे.