Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 6 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Thane News : “दसऱ्यापर्यंत पाणी टंचाई दूर न केल्यास आयुक्तांना…”, जितेंद्र आव्हाडांचा इशारा

गणेशोत्सवात पाण्याची टंचाई निर्माण झाली होती, आता नवरात्रोत्सवातही पाणी टंचाई आहे. आता आम्ही तुम्हाला दरऱ्यापर्यंत मुदत देत आहोत. जर, नवरात्रीच्या आत जर पाण्याचा प्रश्न सुटला नाही तर...

  • By श्वेता झगडे
Updated On: Sep 24, 2025 | 06:27 PM
"दसऱ्यापर्यंत पाणी टंचाई दूर न केल्यास आयुक्तांना...", जितेंद्र आव्हाडांचा इशारा (फोटो सौजन्य-X)

"दसऱ्यापर्यंत पाणी टंचाई दूर न केल्यास आयुक्तांना...", जितेंद्र आव्हाडांचा इशारा (फोटो सौजन्य-X)

Follow Us
Follow Us:

ठाणे : गेल्या अनेक दिवसांपासून कळवा, मुंब्रा भागातील नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. अनेकदा तक्रारी करूनही पाण्याची समस्या सोडविण्यात येत नसल्याने राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉ.जितेंद्र आव्हाड यांनी थेट ठाणे महानगर पालिकेवर धडक दिली. यावेळी त्यांच्यासोबत विरोधीपक्ष नेते शानू पठाण आणि कळवा, मुंब्रा परिसरातील अनेक महिला उपस्थित होत्या. गणेशोत्सवात पाण्याची टंचाई निर्माण झाली होती, आता नवरात्रोत्सवातही पाणी टंचाई आहे. आता आम्ही तुम्हाला दरऱ्यापर्यंत मुदत देत आहोत. जर, नवरात्रीच्या आत जर पाण्याचा प्रश्न सुटला नाही. तर आयुक्तांना त्यांच्या दालनातच कोंडून ठेवू, असा इशारा यावेळी डॉ.जितेंद्र आव्हाड यांनी दिला.

कळवा आणि मुंब्रा येथील विविध भागात गेल्या अनेक दिवसांपासून पाण्याचे प्रचंड दुर्भिक्ष्य जाणवत आहे. पाणीपुरवठा करताना ठाणे महानगर पालिकेकडून सापत्न वागणूक दिली जात असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून केला जात आहे. या संदर्भात तक्रार केल्यानंतरही कार्यवाही होत नसल्याने आज डॉ.जितेंद्र आव्हाड, शानू पठाण यांच्यासह येथील महिलांनी ठाणे पालिकेत धडक दिली.

Hinjewadi Metro News : हिंजवडी ते बाणेर मेट्रोला कधी मिळणार मुहूर्त? दिवाळीपूर्वी सुरु करण्याची IT कर्मचाऱ्यांची मागणी

डॉ.जितेंद्र आव्हाड यांनी या महिलांसह पाणी खात्याचे अभियंता विनोद पवार यांच्या दालनात ठाण मांडून पाणीपुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली. डॉ.जितेंद्र आव्हाड यांनी, कळवा- मुंब्रा परिसरातील पाणी टंचाईमागे राजकीय कारण आहे. ठाणे शहरात सर्वत्र पाणी उपलब्ध असताना कळवा, मुंब्र्यात पाण्याची टंचाई का? मुंब्र्याच्या अल्मास कॉलनीतील संप-पंप केंद्राचा पंप सहा दिवस बंद आहे. अवघे पाच हजार रूपये खर्च असताना तो देखील पालिका करीत नाही. कल्याण फाटा येथे वॉल्व्ह उघडून पाणी डायव्हर्ट केले जात असल्याने मुंब्र्याला पाणी पुरवले जात नाही. कळवा, मुंब्रा भागातील गोरगरीब जनतेला तहानेने मारण्याचा विचार आहे का? कळवा, मुंब्र्यातील ही पाणी टंचाई आता सहन करण्याच्या पलिकडे आहे. असे असताना सत्ताधारीच मोर्चे काढत आहेत. पाणी देण्याची जबाबदारी शासनाची आहे. सरकारने पाण्याचा पुरवठा वाढविण्याचे सोडून मोर्चे कसले काढताय?, असा सवाल आव्हाड यांनी उपस्थित केला.

मेट्रोसाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री ठाण्यात येतात. निवडणुकीसाठी पूर्णत्वास न आलेल्या मेट्रोची ट्रायल रन घेतली जाते. मात्र, पाण्यासारखी मूलभूत गरज भागविली जात नाही. घोडबंदर रोडला पाणी नाही, कळवा- मुंब्र्यात पाणी नाही मात्र नौपाड्यात प्रचंड पाणीपुरवठा होत आहे. मग, इतर भागांनी काय पाप केले आहे. दलित, शोषित वर्गाला जाणीवपूर्वक पाणी दिले जात नाही, असा आरोप करून ठाण्यासाठी मी स्वतः धरण आणले होते. पण, इथल्या सत्ताधाऱ्यांच्या हव्यासामुळे ते धरण हातचे गेले आहे. आता नवरात्रीच्या आत जर पाण्याचा प्रश्न सुटला नाही. तर आयुक्तांना त्यांच्या दालनातच बंद करून ठेवू, असा इशारा डॉ.जितेंद्र आव्हाड यांनी दिला.

Maharashtra Heavy rains: अतिवृष्टी, पूरस्थिती अन् मृत्यू…:मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री फडणवीसांचे महत्त्वाचे आदेश

Web Title: Women in mumbra are protesting for water at the thane district headquarters

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 24, 2025 | 06:26 PM

Topics:  

  • Jitendra Awhad
  • Mumbai
  • thane

संबंधित बातम्या

Virar Accident: भरधाव थार थेट घरात घुसली; भिंत कोसळून घरमालक जखमी, दोन दुचाकींचे नुकसान
1

Virar Accident: भरधाव थार थेट घरात घुसली; भिंत कोसळून घरमालक जखमी, दोन दुचाकींचे नुकसान

Mira Bhayandar News: फेरीवाला ओळखपत्र वाटपाचा अधिकार ठेकेदाराला कोणी दिला? समितीला अंधारात ठेवून कार्डांचे वाटप
2

Mira Bhayandar News: फेरीवाला ओळखपत्र वाटपाचा अधिकार ठेकेदाराला कोणी दिला? समितीला अंधारात ठेवून कार्डांचे वाटप

Thane News: टेंभी नाका नवरात्रोत्सवामुळे वाहतुकीत बदल; २० ऑक्टोबरपर्यंत वाहतूक व्यवस्थेत बदल
3

Thane News: टेंभी नाका नवरात्रोत्सवामुळे वाहतुकीत बदल; २० ऑक्टोबरपर्यंत वाहतूक व्यवस्थेत बदल

Kalagaurav Puraskar 2026: मुंबईत रंगणार ‘कलागौरव पुरस्कार’ सोहळा; ‘या’ क्षेत्रातील गुणवंतांचा सन्मान होणार!
4

Kalagaurav Puraskar 2026: मुंबईत रंगणार ‘कलागौरव पुरस्कार’ सोहळा; ‘या’ क्षेत्रातील गुणवंतांचा सन्मान होणार!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.