कोल्हापुरातील गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीसाठी महायुतीकडून बैठकीला बोलावलं नसल्याने आमदार शिवाजी पाटील यांनी नाराजी व्यक्त केली होती.. शिवाय जमेत धरत नसाल तर आमदार सतेज पाटील लांबचे नाहीत असं वक्तव्य केलं होत..यावर बोलताना आज आमदार सतेज पाटील यांनी शिवाजी पाटील यांच्या भूमिकेचं काही प्रमाणात समर्थन केलंय आमदार शिवाजी पाटील हे महायुतीचे घटक आहेत..त्यामुळे त्यांच्याशी चर्चा करुन त्यांच्या मनातील गोकुळ संदर्भातील गैरसमज दूर करायलं हवे होते..पण हा प्रयत्न दुर्दैवाने महायुतीतून झालेला नाही..गोकूळच्या दूध संकलनात चंदगड , आजरा आणि गडहिंग्लज या तीन तालुक्यांचा सिंहाचा वाटा आहे..त्यामुळे या भागातून गोकूळला नेतृत्व असलं पाहिजे ही आमदार शिवाजी पाटील यांची भूमिका चुकीची नसल्याचं सतेज पाटील यांनी म्हटलंय.. राजर्षी शाहू समविचारी आघाडी म्हणून आम्ही गोकूळची निवडणूक लढवणार आहे..जे जे सोबत येतील त्यांना घेवून पुढे जाणार आहे..परंतु गोकुळ बाबत आमदार शिवाजी पाटील यांच्याशी माझी कोणत्याही प्रकारची चर्चा झालेली नाही..आमदार म्हणून त्यांनी भावना व्यक्त केल्याचं सतेज पाटील यांनी स्पष्ट केलंय..अपात्र ठरवलेल्या 427 दुध संस्था आम्ही न्यायालयात जाणार म्हंटल्यावर सरकारने पात्र केल्या..मग कायदेशीर संस्था अपात्र का केल्या होत्या..राजकीय दबाव होता का?असा सवालही त्यांनी केलायं..शिवाय मी वैयक्तिक कुणावर बोलणार नाही..जिल्हा बँक ही जिल्ह्याची बँक आहे..आणि वारणा विनय कोरे यांचा वैयक्तिक संघ आहे..यावर बोलणं संयुक्तिक ठरणार नाही..मात्र जिल्हा बँकेत लक्ष घालण्यापूर्वी आमदार शिवाजी पाटलांना बोलवून घेतलं पाहिजे..त्यांच्याशी चर्चा केली पाहिजे..शिवाजी पाटील आणि प्रकाश बेलवाडे यांच्या मनातील शंकाचं निरसन केलं पाहिजे..उत्तरं दिली पाहिजे असं मत आमदार सतेज पाटील यांनी व्यक्त केलंय